Guru Purnima: गुरु पौर्णिमेला बनतोय दुर्मिळ संयोग; या राशींना मिळणार चांगलं फळ

Guru Purnima 2024: हिंदू पंचांगानुसार, गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे 5.57 पासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहे. हा योग दिवसभर चालणार आहे. याशिवाय उत्तराषाद नक्षत्र पहाटे ते मध्यरात्री 12.14 पर्यंत राहणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Jul 18, 2024, 03:50 PM IST
Guru Purnima: गुरु पौर्णिमेला बनतोय दुर्मिळ संयोग; या राशींना मिळणार चांगलं फळ title=

Guru Purnima 2024: जुलै महिन्यात गुरु पौर्णिमा आहे. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. यावेळी दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. हा दिवस गुरुला समर्पित असल्याचं मानलं जातं. या दिवशी भक्त आपल्या गुरूंची पूजा करतात. यासोबतच या दिवशी महाभारताचे लेखक ऋषी वेद व्यास यांचा जन्म झाला. या कारणास्तव याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. यंदाच्या वर्षी 21 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांचा उत्तम संगम झाल्याचं दिसून येतंय. ज्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. 

गुरु पौर्णिमेच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग

हिंदू पंचांगानुसार, गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे 5.57 पासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहे. हा योग दिवसभर चालणार आहे. याशिवाय उत्तराषाद नक्षत्र पहाटे ते मध्यरात्री 12.14 पर्यंत राहणार आहे. यासोबतच प्रीति योग आणि विषकुंभ योग तयार होणार आहे. ग्रहांच्या स्थितीबद्दल सांगायचे तर सूर्य आणि शुक्र कर्क राशीत राहणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे शुक्रादित्य योग तयार होणार आहे. मंगळ आणि गुरू वृषभ राशीत असणार आहे. यासोबत राहू मीन राशीत, केतू कन्या राशीत आणि शनि मूळ त्रिकोण कुंभ राशीत असल्यामुळे शश राजयोग तयार होणार आहे. त्याचप्रमाणे बुध सिंह राशीत आणि चंद्र मकर राशीत असणार आहे. गुरु वृषभ राशीत असल्यामुळे कुबेर राजयोग तयार होत आहे. यासोबतच सूर्य आणि शनि षडाष्टक योग तयार करणार आहेत.

वृषभ रास (Vrishabha Zodiac)

वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु पौर्णिमेचा दिवस खूप चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांचा त्यांच्या पालकांसोबत चांगला वेळ जाईल. या काळात तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार आहे. नोकरदारांनाही चांगले दिवस येणार आहेत. नवीन मालमत्ता किंवा वाहन घेण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकणार आहे. तुम्ही जीवनात समाधानी दिसू शकता. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

सिंह रास (Leo Zodiac)

सिंह राशीच्या लोकांसाठी गुरू पौर्णिमेचा दिवस खूप चांगला जाणार आहे. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही अनेक प्रकल्प मिळू शकतात. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. तुमच्या करिअर क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला बरेच फायदे मिळणार आहेत. तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. आता तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. 

कुंभ रास (Kumbha Zodiac)

कुंभ राशीच्या लोकांचाही दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून आता चांगला परतावा मिळू शकेल. अशा परिस्थितीत तुमच्यावर काही जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर या काळात तुम्ही ते करू शकता. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. मानसिक तणावातूनही तुम्हाला आराम मिळणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)