Shubh Yog: धनु राशीत एकत्र बनणार 5 शुभ योग; 'या' राशींना मिळणार प्रचंड लाभ

Budhaditya/Mangal Aditya/Navpanch/Chaturgrahi Yog: सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्र धनु राशीत आल्याने ५ शुभ योग तयार होणार आहेत. यामध्ये नवपंचम योग, बुधादित्य योग, आदित्य मंगल राजयोगासोबत धन योग तयार होणार आहे.

सुरभि जगदीश | Updated: Jan 16, 2024, 07:20 AM IST
Shubh Yog: धनु राशीत एकत्र बनणार 5 शुभ योग; 'या' राशींना मिळणार प्रचंड लाभ title=

Budhaditya/Mangal Aditya/Navpanch/Chaturgrahi Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ग्रहांच्या हालचालीतील बदलामुळे अनेक प्रकारचे योग आणि राजयोग तयार होतात. या सर्व योगांचा  12 राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. 

या क्रमाने वर्षांनंतर सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्र धनु राशीत आल्याने ५ शुभ योग तयार होणार आहेत. यामध्ये नवपंचम योग, बुधादित्य योग, आदित्य मंगल राजयोगासोबत धन योग तयार होणार आहे. सोबतच धनु राशीत 4 ग्रह एकत्र आल्यामुळे चतुर्ग्रही योगही तयार होतोय. जाणून घेऊया हे 5 शुभ योग कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहेत.

धनु रास

तुमच्या राशीत हे शुभ तुम्हाला खूप यश मिळवून देईल. नशीब तुमच्या बाजूने राहील. उत्पन्न वाढेल, उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील. जीवनसाथीसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. अपूर्ण काम लवकरच पूर्ण होणार आहे. कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला सौदा मिळू शकतो. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.

मेष रास

धनु राशीमध्ये एकाच वेळी अनेक ग्रहांच्या संयोगामुळे झालेला हा शुभ योग मेष राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान ठरू शकणार आहे. यावेळी नशीब पूर्ण साथ देईल. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेल्या कामांना गती मिळेल. तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. कामं आणि योजनांमध्ये यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. 

सिंह रास 

या शुभ योगांमुळे धनु राशीमध्ये एकाच वेळी तयार होणारे योग लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसतील.
तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन संधीही मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन रास

धनु राशीमध्ये एकाच वेळी अनेक ग्रहांच्या आगमनामुळे तयार झालेला हा शुभ योग राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आणि फलदायी ठरू शकतो. नशीब तुमच्या बाजूने असेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. नवीन नोकऱ्यांसाठी ऑफर येऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )