Four Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदलत असतो. ग्रहांचा राजा सूर्यदेव 16 डिसेंबर शनिवारपासून धनु राशीत आहे. यामुळे सूर्य देव बुधासोबत बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. सूर्याच्या संक्रांतीच्या वेळी मेष राशीत असलेला गुरु नवव्या बाजूने सूर्याकडे पाहत असल्याने राजलक्षण राजयोग निर्माण होणार आहे. तर दुसरीकेड मंगळ स्वतःच्या राशीत फिरत असल्याने रुचक राजयोग तयार करत आहे. तसंच शुक्र स्वतःच्या राशीत असताना मालव्य राजयोग तयार होतो आहे. त्यामुळे तब्बल 500 वर्षांनंतर एकत्र 4 राजयोगाची निर्मिती अनेक राशींसाठी अच्छे दिन आणत आहेत. (4 Rajyog after 500 years Immense money prestige and honor to these zodiac signs)
4 राजयोगांची निर्मिती या राशींसाठी फलदायी ठरणार आहे. तुमच्या संपत्तीत घसघशीत वाढ होणार आहे. सूर्यदेवाच्या आशीर्वादाने तुमचा आत्मविश्वास दुप्पट वाढणार आहे. याशिवाय पैसा आणि मान-सन्मानाच्या बाबतीत विशेष लाभ मिळणार आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे. तिथे तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होणार आहे. त्याच वेळी, हे संक्रमण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश घेऊन येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. याशिवाय यावेळी तुमचं उत्पन्नही वाढणार आहे.
4 राजयोगांची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरणार आहे. यावेळी तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. तसंच, कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होणार आहे. तुम्हाला येत्या वर्षात पदोन्नती मिळणार आहे. तुम्हाला कुठूनतरी नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे. आपण काम किंवा व्यवसायाच्या कारणास्तव प्रवास करणार असून तो तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुमचं दैनंदिन उत्पन्नही वाढणार आहे. तसंच यावेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होणार आहात. यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा मिळणार आहे.
4 राजयोगांच्या निर्मितीमुळे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित सकारात्मक परिणाम दिसणार आहे . व्यावसायिक जीवनात प्रगती होणार आहे. पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळणार आहे. तिथे तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. अविवाहित लोकांसाठी विवाहाची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. तसंच यावेळी तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणार होणार आहे. तुम्ही या काळात बचत करण्यात यशस्वी होणार आहात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)