व्हॅलेंटाइन स्पेशल: टॉप ५ बॉलिवूडच्या रोमँटिक फिल्म

Feb 08, 2015, 22:07 PM IST
1/5

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे

यश चोप्रा यांचा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाने नुकताच मराठ मंदिर चित्रपटगृहात १०००  आठवले चाललेला चित्रपट म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवलंय. १९९५मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाने तरुणांना वेड लावलं होतं. राज (शाहरुख खान) आणि सिमरन (काजोल) यांची ही लव्ह स्टोरी. या स्टोरीनं लाखो जोडप्यांच्या काळजाचा ठोका चुकवला.  

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे यश चोप्रा यांचा 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटाने नुकताच मराठ मंदिर चित्रपटगृहात १०००  आठवले चाललेला चित्रपट म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवलंय. १९९५मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाने तरुणांना वेड लावलं होतं. राज (शाहरुख खान) आणि सिमरन (काजोल) यांची ही लव्ह स्टोरी. या स्टोरीनं लाखो जोडप्यांच्या काळजाचा ठोका चुकवला.  

2/5

हम आपके है कौन

सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या अभिनयाने नटलेला आणि राजश्री प्रॉडक्शनचा 'हम आपके है कौन' हा एक कौंटुबिक चित्रपट. पण यात प्रेम आणि निशाची एक लव्हस्टोरी दडलेली. एकमेकांच्या प्रेमात बुडालेले पण परिस्थितीमुळे नातं तोडायला निघालेलं हे प्रेमीयुगुल. पण म्हणतात ना, लग्नगाठ ही वर देव बांधतो, चित्रपटाचा शेवटही प्रेम आणि निशाच्या लग्नानेच होतो. 

 

हम आपके है कौन सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या अभिनयाने नटलेला आणि राजश्री प्रॉडक्शनचा 'हम आपके है कौन' हा एक कौंटुबिक चित्रपट. पण यात प्रेम आणि निशाची एक लव्हस्टोरी दडलेली. एकमेकांच्या प्रेमात बुडालेले पण परिस्थितीमुळे नातं तोडायला निघालेलं हे प्रेमीयुगुल. पण म्हणतात ना, लग्नगाठ ही वर देव बांधतो, चित्रपटाचा शेवटही प्रेम आणि निशाच्या लग्नानेच होतो.   

3/5

एक दुजे के लिए

'एक दुजे के लिए' ही साऊथ इंडियन तरुण आणि नॉर्थ इंडियन तरुणी यांची प्रेमकथा आहे. कमल हसन आणि रती अग्नीहोत्री यांच्या अभिनयानं तरुण जोडप्यांमधील प्रेम आणि पालकांच्या हट्टासमोर आपल्या प्रेमाचा त्याग हे सर्व उत्कृष्टपणे दर्शविण्यात आलंय. या सर्व संकटांवर मात करत हे प्रेमी कसे एकत्र येतात हेच 'एक दुजे के लिए' मध्ये दाखवण्यात आलंय. 

 

एक दुजे के लिए 'एक दुजे के लिए' ही साऊथ इंडियन तरुण आणि नॉर्थ इंडियन तरुणी यांची प्रेमकथा आहे. कमल हसन आणि रती अग्नीहोत्री यांच्या अभिनयानं तरुण जोडप्यांमधील प्रेम आणि पालकांच्या हट्टासमोर आपल्या प्रेमाचा त्याग हे सर्व उत्कृष्टपणे दर्शविण्यात आलंय. या सर्व संकटांवर मात करत हे प्रेमी कसे एकत्र येतात हेच 'एक दुजे के लिए' मध्ये दाखवण्यात आलंय.   

4/5

बॉबी

ऋषि कपूर आणि डिंपल कपाडिया यांचा पहिलाच चित्रपट 'बॉबी'नं प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटवला. हा चित्रपट एका संपन्न कुटुंबातील हिंदू मुलगा आणि कोळी कुटुंबातील ख्रिश्चन मुलगी यांची प्रेमकहानी आहे. चित्रपटात तरुणांचं पॅशन, प्रेम सर्व कसं विश्वासापलिकडलं आहे, असं दिसतं. 

 

बॉबी ऋषि कपूर आणि डिंपल कपाडिया यांचा पहिलाच चित्रपट 'बॉबी'नं प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळाच ठसा उमटवला. हा चित्रपट एका संपन्न कुटुंबातील हिंदू मुलगा आणि कोळी कुटुंबातील ख्रिश्चन मुलगी यांची प्रेमकहानी आहे. चित्रपटात तरुणांचं पॅशन, प्रेम सर्व कसं विश्वासापलिकडलं आहे, असं दिसतं.   

5/5

मुघल-ए-आझम

बॉलिवूडमधील एक अविस्मरणीय फिल्म म्हणजे मुघल-ए-आझम... हा चित्रपट म्हणजे बॉलिवूडचा एक मानबिंदू ठरलाय. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटात प्रेम, संगीत, राग सर्व गुणांचा समावेश आहे. 

दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या अभिनयानं नटलेला 'मुघल-ए-आझम' चित्रपटातील या जोडीचं एकमेकांवर रिअल लाइफमध्येही किती प्रेम होतं, हेच दाखवतं. जरी त्यांचं प्रेम लग्नबंधनापर्यंत पोहोचलं नाही, तर सिल्व्हर स्क्रीनवर ही जो़डी अजरामर झालीय. दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी सलीम-अनारकली यांच्या प्रेमाला आपल्या अभिनयानं न्याय मिळवून दिला. 

 

मुघल-ए-आझम बॉलिवूडमधील एक अविस्मरणीय फिल्म म्हणजे मुघल-ए-आझम... हा चित्रपट म्हणजे बॉलिवूडचा एक मानबिंदू ठरलाय. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या चित्रपटात प्रेम, संगीत, राग सर्व गुणांचा समावेश आहे.  दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या अभिनयानं नटलेला 'मुघल-ए-आझम' चित्रपटातील या जोडीचं एकमेकांवर रिअल लाइफमध्येही किती प्रेम होतं, हेच दाखवतं. जरी त्यांचं प्रेम लग्नबंधनापर्यंत पोहोचलं नाही, तर सिल्व्हर स्क्रीनवर ही जो़डी अजरामर झालीय. दिलीप कुमार आणि मधुबाला यांनी सलीम-अनारकली यांच्या प्रेमाला आपल्या अभिनयानं न्याय मिळवून दिला.