प्रेमवीरांनो, नकाराची ही कारणं तुम्हीही ऐकलीत का?

Sep 18, 2014, 16:20 PM IST
1/12

ही कारणं ऐकल्यानंतर तुम्ही खरंच विचारात पडाल की मला तर असंच एखादं कारण ऐकायला मिळणार नाही ना? पण, प्रेमवीरांनो अशी कारणं बाजुला सारत खरोखरच तुम्ही एखाद्या तरुणीवर प्रेम करत असाल तर आपल्या सीमा लक्षात ठेवत तिच्यापर्यंत तुमचं प्रेम एकदा तरी नक्कीच पोहचवा... कदाचित गाडी योग्य रुळावरही दाखल होऊ शकेल... काय...

2/12

‘मी तशी मुलगी नाही’
महिलांना दोन भागांत विभागण्यासाठीच जणू या कारणाचा जन्म झालाय. ‘मी इतर मुलींसारखी नाही’ हे शब्द ऐकल्यानंतर मुलांच्या मनात अनेकदा प्रश्न येतो की, ‘मी तशी मुलगी कुठून आणू... मलाही तुझ्यासारखीच तर हवीय’

3/12

‘माझा बॉयफ्रेड आहे’
‘मी अगोदरपासून एन्गेज्ड आहे... माझा बॉयफ्रेड आहे...’ हे ऐकल्यानंतर क्वचितच एखादा मुलगा त्या मुलीचा पुन्हा पाठलाग करेल... त्यामुळेच की काय, हे कारण सगळ्यात आघाडीवर आहे. 

4/12

‘बाबाजी का ठुल्लू’
‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आपला नकार वेगळ्याच शब्दांत कळवण्यासाठी मुली या वाक्याचा वापर मोठ्या दमदारपणे करताना दिसतायत. 

5/12

‘मी अजून लहान आहे’
प्रेम करण्याआधी तिचं मतदान कार्ड किंवा इतर कोणताही जन्माचा पुराव नक्की पाहून ठेवा... नाहीतर तिनं ‘मी अजून लहान आहे’ असं म्हटल तर तुमच्याकडे काहीच उत्तर नसेल. 

6/12

‘माझ्यासाठी माझं करिअर महत्त्वाचं…’
प्रेम केल्यानंतर करिअरची वाट लागते... वेळ आणि पैसा वाया जातो... अशी अनेकांची धारणा असते... आणि हे सत्य मुलांना अनेकदा ते प्रेम करत असलेल्या मुलीकडूनच समजतं. एव्हाना त्यानं आपल्या ट्यूशन फीचे पैसे तिच्यासाठी ग्रिटिंग कार्ड विकत घेण्यासाठी खर्च केलेले असतात. 

7/12

आई-वडिलांचं काय?
एखाद्या तरुणानं आपले सगळे देव पाण्यात ठेऊन तरुणीसमोर प्रेम व्यक्त केलंच तर समोरून लगेचच प्रश्न येतो... मी आई-वडिलांना फसवू शकत नाही... ते काय म्हणतील? त्यांचं हे उत्तर ऐकून मुलाला वाटू शकतं की मी नक्की हिलाच विचारलंय की हिच्या आई वडिलांना?

8/12

‘सगळे मुलं एका माळेचे मणी...’ 
प्रेमात एकदा ठेच लागलेल्या मुलींच्या मनात मुलांविषयी एक तेढ निर्माण झालेली दिसते... सगळी मुलं म्हणजे सारखीच असल्याचं त्या म्हणून टाकतात. समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं त्यांना कठिण जातं. 

9/12

‘थोबाड आरशात पाहिलंस का?’
जिथं प्रेम करणाऱ्याचं मन नाही तर त्याचा चेहरा पाहिला जातो... तिथं यापेक्षा दुसरं उत्तर तुम्हाला मिळूच शकत नाही. अनेकदा तरुणी प्रेम करणारा व्यक्ती कसा आहे यापेक्षा कसा दिसतो याकडे जास्त लक्ष देताना दिसतात. तेव्हा ‘तुझं थोबाड आरशात बघ...’ असा उद्दाम सल्ला देऊन त्या मोकळ्या होतात. अर्थातच समोरच्या व्यक्तीचं हृद्याचे तुकडे तुकडे होतात. मग मात्र ते आपल्या थोबडाकडे जरा जास्तच लक्ष द्यायला लागतात. 

10/12

‘प्रेम... आणि मी... शक्यच नाही...’
ज्याप्रमाणे भूत आहे किंवा नाही, असा प्रश्न तुम्हाला नेहमी पडतो त्याचप्रमाणे अनेक तरुणींना प्रेमाच्या अस्तित्वावरच संशय असतो. अशामध्येच एखादा अशा एखाद्या तरुणीच्या प्रेमात पडला तर त्याला पहिलं उत्तर मिळतं... ‘प्रेम... माय फूट... माझा प्रेमावर विश्वास नाही’. हे कारण आत्तापर्यंत एखाद्या जुन्या रेकॉर्डप्रमाणे असलं तरी त्याचा वापर मात्र फारच कमी वेळा होताना दिसतो. 

11/12

‘तू तर माझ्या भावासारखा आहेस...’ 
चिपको प्रेमवीरांना टाळण्यासाठी मुलींच्या डोक्यात पहिलं काय येत असेल तर ती राखी असते... ‘मी तुला कधी या नजरेनं पाहिलंच नाही... तू तर मला माझ्या भावासारखा वाटतोस... आणि तू... शी...’ मुलांमध्ये धिक्काराची भावना जागवण्यासाठी हे कारणं पुरेसं असतं. मुलींचं हे कारण ऐकून प्रेमभंग झालेल्या प्रेमवीरांना धक्क्यातून सावरायला बराच वेळ लागतो. 

12/12

‘आयुष्यात प्रेम एकदाच होतं...’ सारखे टिपिकल वाक्य ज्यांना रटाळ वाटतात असे प्रेमवीर प्रेमाच्या आणाभाका घेताना एकापेक्षा जास्त वेळा दिसतात... असे अनुभव मुलींनाही एकापेक्षा जास्त वेळा आलेले असतात. त्यामुळे त्यांच्याकडेही या ‘प्रियकरांना’ टाळण्याची अनेक कारणं तयार असतात... एक नजर टाकुयात अशाच काही कारणांवर... 