'गूगल'च्या सुंदर पिचाई यांच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत...

Aug 12, 2015, 13:45 PM IST
1/9

सुंदर पिचाई यांना गूगगलचा सीईओ बनवल्या गेल्यानं टेक वर्ल्डमध्ये भारताचं उड्डान चांगलंच उंचावलंय. गेल्या वर्षीच मायक्रोसॉफ्टनं भारतीय वंशाच्या सत्या नाडेला यांना कंपनीचा सीईओ बनवलं होतं. याशिवाय, नीकेश अरोडा सॉफ्ट बँकेचे सीईओ आहेत. गूगलमध्येही आणखी दोन मूळ भारतीय वंशाचे मोठे अधिकारी आहेत. अमित सिंघल आणि श्रीधर रामस्वामी गूगलचे वाईस प्रेसिडेंट आहेत.  

2/9

गेल्या वर्षी ट्विटर आणि मायक्रोसॉफ्टनंही पिचाई यांना आपल्या गोटात सामावून घेण्याचा प्रयत्न केला होता. एका रिपोर्टनुसार, ट्विटरनं २०११ साली पिचाई यांना जॉब ऑफर केला होता. परंतु, गूगलनं त्यांना ५० मिलियन डॉलर (३०५ करोड रुपये) देऊन त्यांना आपल्याकडेच थांबवून घेतलं. 

3/9

अॅन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलमेंटमध्येही पिचाई यांची भूमिका महत्त्वाची ठरली. गेल्या वर्षी त्यांचं प्रमोशन झालं होतं आणि त्यांना गूगल अॅन्डॉईडचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आलं. यामुळे त्यांची भूमिका आणखीनच जास्त महत्त्वपूर्ण बनली. 

4/9

त्यांच्याकडे दिली गेलेली अॅन्ड्रॉईड, क्रोम आणि अॅप्स डिव्हिजनचीही जबाबदारी त्यांनी योग्यपणे हाताळली. यानंतर त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रोडक्ट इनोव्हेट केले. 

5/9

गेल्या वर्षी त्यांनी कंपनीच्या नव्या 'प्रोडक्ट चीफ'चा हुद्दा मिळाला होता. ज्यामुळे ते लॅरी पेज यांच्यानंतर कंपनीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे अधिकारी बनले होते. पिचाई यांनी सीनिअर वाईस प्रेसिडंट म्हणूनही कंपनीत कारभार हाताळलाय. 

6/9

एका रिपोर्टनुसार एकेकाळी चेन्नईमध्ये दोन खोल्यांच्या घरात राहणाऱ्या सुंदर पिचाई यांच्या कुटुंबात ना टीव्ही होता, ना टेलिफोन, ना कार... पण, अभ्यासात मात्र पिचाई कधीच मागे पडले नाहीत. आपल्या मेहनतीचं फळ त्यांना तेव्हा मिळालं जेव्हा त्यांना आयआयटी खडगपूरमध्ये प्रवेश मिळाला. इथून इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांना स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप मिळाली आणि अमेरिका हे त्यांचं दुसरं घर बनलं. 

7/9

सुंदर पिचाई यांनी आयआयटी खडगपूरमधून मेटालर्जिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड़ युनिव्हर्सिटी आणि वॉर्टन बिझनेस स्कूलमधूनही शिक्षण घेतलं. सध्या सुंदर पिचाई यांचं नाव टेक वर्ल्डमध्ये मोठ्या आदरानं घेतलं जातं. 

8/9

सुंदर पिचाई ही अशी व्यक्ती आहे, ज्यांनी कमीत कमी वेळेत मोठं नाव कमावलंय. चेन्नईमध्ये जन्म घेतलेले सुंदर हे गेल्या ११ वर्षांपासून गूगलशी जोडली गेलेत. ४३ वर्षांच्या सुंदर पिचाई यांनी २००४ मध्ये गूगलमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. 

9/9

जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन अशी ओळख असलेल्या गूगलनं आता एक नवी कंपनी बनवलीय... या कंपनीचं नाव आहे 'अल्फाबेट इंक'... महत्त्वाचं म्हणजे गूगलचा सगळाच कारभार आता या कंपनीमार्फत हाताळला जाणार आहे. तसंच भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे आता गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असतील. 