सावधान... एकाच जागी बसून राहण्यापूर्वी हे जरूर वाचा!

Dec 16, 2014, 16:07 PM IST
1/12

- जेवढं शक्य असेल तेवढ मध्ये – मध्ये चालत राहा. टीव्ही पाहत असल्यास जाहिरातींदरम्यान एक फेरफटका मारून येऊ शकता.

- ऑफिसमध्ये असल्यास शक्य असेल तर काही वेळ उभं राहून काम करा... किंवा प्रत्येक अर्ध्या तासाला काही मिनिटं उभं राहण्याचा किंवा चालण्याचा प्रयत्न जरूर करा. 

- जेवढं शक्य असेल तेवढ मध्ये – मध्ये चालत राहा. टीव्ही पाहत असल्यास जाहिरातींदरम्यान एक फेरफटका मारून येऊ शकता. - ऑफिसमध्ये असल्यास शक्य असेल तर काही वेळ उभं राहून काम करा... किंवा प्रत्येक अर्ध्या तासाला काही मिनिटं उभं राहण्याचा किंवा चालण्याचा प्रयत्न जरूर करा.   

2/12

- कंबर लवचिक राहण्यासाठी योगाभ्यास करू शकता. 

- एखाद्या एक्सरसाईज बॉल किंवा स्टूलसारख्या अस्थिर आसनांवर बसा. यामुळे पोटाच्या – कंबरेच्या मांसपेशी काम करतील. बसताना सरळ बसा आणि तुमचे पायही सरळ ठेवा. त्यामुळे पायांवरही थोडं वजन पडत राहील.

- कंबर लवचिक राहण्यासाठी योगाभ्यास करू शकता.  - एखाद्या एक्सरसाईज बॉल किंवा स्टूलसारख्या अस्थिर आसनांवर बसा. यामुळे पोटाच्या – कंबरेच्या मांसपेशी काम करतील. बसताना सरळ बसा आणि तुमचे पायही सरळ ठेवा. त्यामुळे पायांवरही थोडं वजन पडत राहील.

3/12

- कंबरेच्या खालच्या भागाला खुर्चीचा सपोर्ट राहील याची काळजी घ्या

- दिवसातून कमीत कमी एकदा तरी तीन मिनिटांपर्यंत मांड्यांच्या स्नायूंना स्ट्रेच करा 

- कंबरेच्या खालच्या भागाला खुर्चीचा सपोर्ट राहील याची काळजी घ्या - दिवसातून कमीत कमी एकदा तरी तीन मिनिटांपर्यंत मांड्यांच्या स्नायूंना स्ट्रेच करा   

4/12

- तुमचे हात बगलेत जोडून ठेवा

- हाताचे कोपर ९० डिग्री कोणात राहतील याची काळजी घ्या.  

- तुमचे हात बगलेत जोडून ठेवा - हाताचे कोपर ९० डिग्री कोणात राहतील याची काळजी घ्या.    

5/12

गंभीर परिणाम टाळण्यासाठी काही सोप्या टीप्स...
- खांदे नेहमी हलके ठेवा

- खुर्चीवर बसताना थोडं पुढच्या बाजुला झुकून बसा

गंभीर परिणाम टाळण्यासाठी काही सोप्या टीप्स...
- खांदे नेहमी हलके ठेवा - खुर्चीवर बसताना थोडं पुढच्या बाजुला झुकून बसा

6/12

- दीर्घकाळापर्यंत खुर्चीवर बाक काढून बसल्यानं खांदेदुखीची समस्या उद्भवते. खांद्याच्या हाडांवर आणि माकड हाडावर याचा वाईट परिणाम होतो. लवकर लक्ष न दिल्यास ही समस्या कायमचा पिच्छा पुरवते.

- दीर्घकाळापर्यंत खुर्चीवर बाक काढून बसल्यानं खांदेदुखीची समस्या उद्भवते. खांद्याच्या हाडांवर आणि माकड हाडावर याचा वाईट परिणाम होतो. लवकर लक्ष न दिल्यास ही समस्या कायमचा पिच्छा पुरवते.

7/12

- कमी हालचाल झाल्यानं तुमच्या मांड्यांचे स्नायू छोटे आणि टाईट होण्यास सुरूवात होते... यामुळे शरीराचा बॅलन्स आणि लवचिकता कमी होते. 

- चालत-फिरत राहिल्यानं मेंदूला फ्रेश ऑक्सिजन आणि रक्त पुरवठा होतो... पण, याच्याउलट तासनतास बसून राहिल्यानं मेंदू सुस्त होत जातो. 

- कमी हालचाल झाल्यानं तुमच्या मांड्यांचे स्नायू छोटे आणि टाईट होण्यास सुरूवात होते... यामुळे शरीराचा बॅलन्स आणि लवचिकता कमी होते.  - चालत-फिरत राहिल्यानं मेंदूला फ्रेश ऑक्सिजन आणि रक्त पुरवठा होतो... पण, याच्याउलट तासनतास बसून राहिल्यानं मेंदू सुस्त होत जातो. 

8/12

- जास्त वेळ बसून राहिल्यानं मलाशय, गर्भाशय आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका उद्भवतो, असं संशोधनातून समोर आलंय.

- खुर्चीवर बाक काढून बसल्यामुळे पोटाच्या स्नायूंचा वापर होत नाही. याचा वाईट परिणाम पाठिच्या स्नायुंवर आणि हाडांवर होतो. यामुळे, तुमच्या शारीरिक मुद्रेवर (पॉश्चर) वाईट परिणाम होतो. 

- जास्त वेळ बसून राहिल्यानं मलाशय, गर्भाशय आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोका उद्भवतो, असं संशोधनातून समोर आलंय. - खुर्चीवर बाक काढून बसल्यामुळे पोटाच्या स्नायूंचा वापर होत नाही. याचा वाईट परिणाम पाठिच्या स्नायुंवर आणि हाडांवर होतो. यामुळे, तुमच्या शारीरिक मुद्रेवर (पॉश्चर) वाईट परिणाम होतो. 

9/12

- पायांमधला रक्तप्रवाह कमी होत जातो. त्यामुळे, पाय सुजल्यासारखे होतात तसंच रक्त गोठून राहिल्यानं पायाच्या अनेक गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं.

- चालत किंवा धावत राहिल्यास शरीरातील हाडं मजबूत होतात. तर तासनतास बसून राहिल्यानं ओस्टिओपोरोसिस (हाडं ठिसूळ होणं) होण्याची शक्यता बळावते.

- पायांमधला रक्तप्रवाह कमी होत जातो. त्यामुळे, पाय सुजल्यासारखे होतात तसंच रक्त गोठून राहिल्यानं पायाच्या अनेक गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं. - चालत किंवा धावत राहिल्यास शरीरातील हाडं मजबूत होतात. तर तासनतास बसून राहिल्यानं ओस्टिओपोरोसिस (हाडं ठिसूळ होणं) होण्याची शक्यता बळावते.

10/12

- बसून राहिल्यानं शरीरातील फॅट कमी प्रमाणात बर्न होतात. यामुळे, शरीरात अॅसिड जमण्यास सुरुवात होते. यामुळे हृदयाशी संबंधीत अनेक आजारांना सामोरं जावं लागू शकतं. 
 
- शरीरात जास्त इन्सुलिन निर्माण झाल्यानं तुम्हाला डायबेटीज आणि त्याच्याशी निगडीत अनेक समस्या उद्भवू शकतात.

11/12

- जेव्हा आपण बाक काढून बसतो अशावेळी आपली कंबर एखाद्या स्पंजप्रमाणे दाबली जाते. त्यामुळे, शरीरातील रक्त आणि न्यूट्रिएंटस् शोषले जातात. जास्त वेळ बसून राहिल्याने या प्रक्रियेवर परिणाम होतो आणि कंबरेची लवकचिकताही कमी कमी होत जाते. त्यामुळे कंबरदुखीचा त्रास मागे लागतो. 

12/12

काम करताना किंवा टीव्ही पाहताना खूप वेळ एकाच जागी बसून राहिल्यास त्याचे अतिशय गंभीर दुष्परिणाम पाहायला मिळू शकतात. हे तुमच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक ठरू शकतं. हे दुष्परिणाम जाणून घेऊन ते टाळण्यासाठी काय काय करता येऊ शकतं, पाहुयात... 