कळत - नकळत हे कायदे तुम्ही सर्रास तोडता...

Jul 18, 2015, 18:58 PM IST
1/8

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणं
तुम्ही तुम्हाला हवं त्या ठिकाणी धुम्रपान करू शकत नाही. मग ते चहाची टपरी असो किंवा मोकळा रस्ता... २००८ च्या कायद्यानुसार मॉल्स, सिनेमागृह, हॉटेल किंवा पार्कमध्ये धुम्रपान करण्यावर बंदी आहे. 

2/8

पॉर्न शेअर करणं
पॉर्न साईट पाहणं हा गुन्हा नाही. परंतु, पॉर्न शेअर करणं मात्र नक्कीच गुन्हा आहे. सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार, पॉर्न साईटवर बॅन लावला जाऊ शकत नाही. परंतु, आयटी अॅक्ट २००० नुसार कोणत्याही व्यक्तीनं कोणत्याही प्रकारची अश्लील गोष्ट शेअर केली तर त्याला सात वर्षांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही होऊ शकतं.

3/8

मित्रांसोबत पैज लावणं
कायद्यानं कोणत्याही प्रकारच्या सट्टेबाजीला बंदी घालण्यात आलीय. हा राज्याशी निगडीत मुद्दा आहे. प्रत्येक राज्यातील कायदा वेगवेगळा आहे. परंतु, जास्तीत जास्त राज्यांत पैज लावण्यावर बंदी आहे.

4/8

गाडी चालवताना मोठ्या आवाजात गाणी ऐकणं
गाडी चालवताना मोठ्या आवाजात गाणी ऐकणं हे आजकाल तरुणाईचं फॅड झालंय. पण, हे करतानाही ते कायद्याचं उल्लंघन करत असतात. ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार हा कायदा तोडणाऱ्यांवर दंड लावला जाऊ शकतो.

5/8

खोटा आयडी बनवणं
आपल्या प्रेयसीला किंवा प्रियकरावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्याची जासूसी करण्यासाठी सोशल बेवसाईटवर खोटं अकाऊंट आत्तापर्यंत अनेकांनी बनवली असतील... पण, आयटी अॅक्ट २००० नुसार खोटं अकाऊंट बनवणं हा गुन्हा आहे. यासाठी तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

6/8

डिजिटल पायरसी
टॉरेन्टस डाऊनलोड करणं हा गुन्हा आहे, हे एव्हाना आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. कॉपीराईट कायद्यान्वये तुम्ही व्हिडिओ/ऑडिओच्या मालकाच्या परवानगीशिवाय इथून कोणतीही गोष्ट डाऊनलोड करू शकत नाहीत.

7/8

सार्वजनिक ठिकाणी 'हॅप्पी बर्थडे टू यू' गाणं

थोडं आश्चर्य वाटलं का? कारण हा कायदा तर आपण सर्रास तोडत असतो... आपल्या जवळच्या कुणाचाही वाढदिवस असला की आपण त्यांच्यासाठी हे गाणं हमखास गातो. 

खरं म्हणजे हे गाणं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आलंय... आणि या गाण्याचं कॉपीराईट वॉर्नर म्युझिक कंपनीकडे आहेत. या गाण्याच्या मालकाला त्याची किंमत दिल्याशिवाय तुम्ही हे गाणं सार्वजनिक ठिकाणी गाऊ शकत नाहीत. हे कायद्याचं उल्लंघन आहे. पण... किसको फिकर... 

सार्वजनिक ठिकाणी 'हॅप्पी बर्थडे टू यू' गाणं थोडं आश्चर्य वाटलं का? कारण हा कायदा तर आपण सर्रास तोडत असतो... आपल्या जवळच्या कुणाचाही वाढदिवस असला की आपण त्यांच्यासाठी हे गाणं हमखास गातो.  खरं म्हणजे हे गाणं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आलंय... आणि या गाण्याचं कॉपीराईट वॉर्नर म्युझिक कंपनीकडे आहेत. या गाण्याच्या मालकाला त्याची किंमत दिल्याशिवाय तुम्ही हे गाणं सार्वजनिक ठिकाणी गाऊ शकत नाहीत. हे कायद्याचं उल्लंघन आहे. पण... किसको फिकर... 

8/8

कळत-नकळत अनेकदा तुम्ही कायदे मोडता... मग, ते लाल दिव्याला कानाडोळा करत सिग्नल तोडणं असू द्या किंवा हेल्मेटविना बाईक रायडिंग असू द्या... 

पण, काही कायदे असेही आहेत जे तुम्हाला कदाचित माहीतही नसतील... आणि अर्थातच तुम्ही तुमच्या नकळत त्या कायद्यांचं सर्रास उल्लंघन करत असता... चला आम्ही तुम्हाला सांगतोय काही असेच कायदे...

कळत-नकळत अनेकदा तुम्ही कायदे मोडता... मग, ते लाल दिव्याला कानाडोळा करत सिग्नल तोडणं असू द्या किंवा हेल्मेटविना बाईक रायडिंग असू द्या...  पण, काही कायदे असेही आहेत जे तुम्हाला कदाचित माहीतही नसतील... आणि अर्थातच तुम्ही तुमच्या नकळत त्या कायद्यांचं सर्रास उल्लंघन करत असता... चला आम्ही तुम्हाला सांगतोय काही असेच कायदे...