मुंबई : लग्नाचा निर्णय हा आयुष्यातील एक महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे असते. लग्न करण्याआधी स्वत:ला एक प्रश्न नक्की विचारा की तुम्ही लग्नाची जबाबदारी घेण्यासाठी कितपत तयार आहात. आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही लग्नासाठी कितपत तयार आहात हे तुम्हालाही कळेल. जाणून घ्या लग्न करण्याची योग्य वेळ काय आहे...
१. आयुष्यात तुम्ही करिअर तसेच आर्थिकस्तरावर यशस्वी असाल तर तुम्ही लग्नाचा निर्णय घेऊ शकता. लग्न करताना हा विचार करु नका की तुमचा पार्टनर किती कमावतो तर आयुष्यात आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तो किती सक्षम आहे हे बघा. ज्यामुळे गरज पडल्यास ती व्यक्ती तुमच्या कुटुंबाचा आधार बनू शकेल.
२. तुम्हाला तुमचा एखादा मित्र वा मैत्रीण आवडत असेल आणि तुम्हाला विश्वास असेल की त्या व्यक्तीसोबत तुम्ही तुमचे आयुष्य चांगले घालवू शकता . तसेच ती व्यक्ती तुम्हाला समजून घेते. आपल्या निवडीवर तुम्हाला पूर्णपणे विश्वास असेल तर तुम्ही लग्नाचा निर्णय घेऊ शकता.
३. चांगला असो वा वाईट प्रत्येक व्यक्तीचा एक भूतकाळ असतो. भूतकाळ हा भूतकाळ समजून विसरणे कधीही चांहले. जेव्हा तुम्हाला स्वत:ला पटेल की तुम्ही तुमचा भूतकाळातील कटू नात्यांच्या आठवणींना विसरुन जीवनात पुढे जाण्यास तयार आहात तसेच ज्या व्यक्तीला तुम्ही मनापासून आपलेसे केलेय तर तुम्ही लग्नाचा निर्णय घेऊ शकता. मात्र लग्नाआधी आपल्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी पार्टनरसोबत नक्की शेअर करा. यामुळे तुम्हा दोघांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल.
४. जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तर अनेकदा तुम्हाला त्या व्यक्तीमधील दोष दिसत नाहीत. यावेळी लग्न करण्यासाठी आपल्या पार्टनरबाबत आपले कुटुंब तसेच मित्रांचा सल्ला जरुर घ्या. कारण आपले कुटुंब आणि जवळचे लोक आपली सपोर्ट सिस्टीम असते.
५. जेव्हा तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल की तुम्ही लग्नासाठी तयार आहात तसेच पार्टनर म्हणून योग्य व्यक्तीची निवड केलीये तर हीच लग्नासाठी योग्य वेळ आहे.
६. जर तुम्हाला स्वत:बद्दल विश्वास वाटत असेल की कोणत्याही परिस्थितीचा सामना करु शकता. तितके तुम्ही मॅच्युअर आहात तसेच गोष्टी योग्य पद्धतीने हाताळू शकता तर तुम्ही लग्नाचा निर्णय घेऊ शकता.