वयाच्या साठीतही Salman ची Ex-girlfriend दिसते खूपच हॉट; जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य!

Salman Khan Girlfriend Sangeeta Bijlani Fitness: बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा कालच 57 वा वाढदिवस (Salman Kahn 57th Birthday) अख्ख्या बॉलिवूडमध्ये साजरा करण्यात आला. 

Updated: Dec 28, 2022, 08:00 PM IST
वयाच्या साठीतही Salman ची Ex-girlfriend दिसते खूपच हॉट; जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य! title=
Sangeeta Bijlani

Salman Khan Girlfriend Sangeeta Bijlani Fitness: बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा कालच 57 वा वाढदिवस (Salman Kahn 57th Birthday) अख्ख्या बॉलिवूडमध्ये साजरा करण्यात आला. आपल्या वाढदिवसानिमित्त सलमान खाननं अगदी साध्या पद्धतीनेच सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्याला सलमानच्या घरी बॉलिवूडमधील मोठे सेलिब्रेटी उपस्थित होते. यावेळी सगळ्यांचेच लक्ष वेधले ते सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडनं. सलमान खानचं (Salman Khan Ex Girlfriend) एकेकाळी जिच्याशी लग्न होणार होतं ती संगीता आवर्जून सलमान खानच्या वाढदिवसाला आल्यानं सलमानच्या चाहत्यांच्या नजरा त्याच दोघांकडे वळल्या होत्या. यावेळीच्या आपल्या बर्थडे पार्टीला संगीतानंही सलमान खानला खास भेट दिली आणि यावेळी संगीताला मिठीत घेत सलमाननं तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. सलमान आणि संगीता हा अंदाज कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यानंतर हा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Salman Khan Kisses Sangeeta Bijalani Forehead) झाला. 

कोण आहे संगीता बिजलानी? 

90 च्या दशकात संगीता बिजलानीचं नावं तुम्ही ऐकलं असेलच. एकेकाळी सलमानच्या हिरोईन्सच्या तोडीसतोड अभिनेत्रींपैंकी एक असणाऱ्या ही अभिनेत्री नंतर रूपेरी पडद्यापासून दूरच राहिली. आज संगीता ही 62 वर्षांची आहे आणि या वयातही तिचा फिटनेस सगळ्यांच्याच नजरेत भरतो. फिटनेस, स्किन आणि ब्यूटी पाहून भलेभले लोंक आजही तिच्यावर फिदा आहेत. एकेकाळी सलमान खानसोबत तिचं नावं जोडलं गेलं होतं. संगीताचं नावं सलमान खानशी जोडलं गेल्यानंतर तिच्या वैेयक्तिक आयुष्याची फार चर्चा होऊ लागली. त्याचबरोबर त्यांच्या नात्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. त्या दोघांचे नाते तुटल्यानंतरही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक तऱ्हेच्या चर्चा होऊ लागल्या होत्या. आजही त्या होतात. क्रिकेटर अझरूद्दीन हा संगीता पुर्वाश्रमीचा पती आहे. तर यापुर्वी तिचं सलमान खानसोबत लग्न होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 

संगीता वयाच्या 60 व्या वर्षीही आहे तितकीच फीट! 

एका मुलाखतीत संगीतानं सांगितलं होतं तिच्या फिटनेसच्या मागचं रहस्य (Sangeeta Bijlani Fitness) म्हणजे सतत आनंदी राहणं हे आहे. ती मुख्यत्वे योगा करते. ती गेल्या अनेक वर्षांपासून योगा करते आहे. ती म्हणाली की तिच्या वडिलांनी तिला योगा शिकवला आहे. आपल्या मुलाखतीत बोलताना ती म्हणाली होती की ती योगा तर कधीच चुकवत नाही परंतु त्याचसोबतच ती मेडिटेशनही करते. तिचा असा विश्वास आहे की त्यानं आपण जास्त तरूण दिसतो. संगीता सोशल मीडियावर अनेकदा फिटनेसशी संबंधित पोस्ट शेअर करत असते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया वैद्यकीय सल्ला घ्या.)