तिला प्रियकराने दिला धोका, ९ महिन्यात घेतला असा बदला, जगाने केला कौतुकाचा वर्षाव

 शनायाच्या ट्विटला आतापर्यंत १ लाख १८ हजारांहून अधिक लाईक्स आल्या आहेत. तर, तिचे ट्विट १३ हजारंहून अधिक वेळा रिट्विट केले गेले आहे. लोकांनी तिच्या या हिमतीचे प्रचंड कौतुक केले आहे.

Updated: May 3, 2018, 01:13 PM IST
तिला प्रियकराने दिला धोका, ९ महिन्यात घेतला असा बदला, जगाने केला कौतुकाचा वर्षाव title=

मुंबई : प्रेमभंगाचे दुख: हे जरा जास्तच चटका लावणारे असते. त्यात प्रेमभंग होताना जर व्यक्तिच्या आत्मसन्मानाला ठेच लागली तर, त्या अपमानाचा जागा बदला घेऊनच भरली जाते. असे झाले आहे वेल्श (वेल्स देशाची नागरिक) येथील एका विद्यार्थिनी तरूणीसोबत. शनाया मार्टिन असे तिचे नाव. साधारण ९ महिन्यांपुर्वी शनायाला तिच्या प्रियकराने प्रेमात धोका दिला. या धोक्यामुळे तिला प्रचंड धक्का बसला. मग तिने या धक्क्यातून सावरण्याचा निर्णय घेत आखणी करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली.

धोका देणाऱ्याचे आभार

शनायाने मोठ्या नियोजनबद्ध पद्धतीने आपल्या शरीराच्या तंदुरूस्तीकडे (फिटनेस) लक्ष केंद्रीत केले. त्यासाठी योग्य आहार (डायेट) आणि व्यायाम याचीही आखणी करून घेतली. तब्बल ९ महिन्यांनंतर शनायाने आपली पुर्वीची आणि सध्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) पोस्ट केली. तिने म्हटले की, 'या ९ महन्यांच्या कालावधीत माझे वजन ४ स्टोन (किलो) कमी झाले आहे. मला धोका देणाऱ्याचे खूप खूप आभार. या धोक्यामुळेच मला असे होण्यासाठी प्रेरणा मिळाली.' ब्रिटन येथील एका वेब-पोर्टल युनिलॅंडसोबत बोलताना १९ वर्षांची शनाया सांगते की, 'मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण, जेव्हा मला कळले की, मला धोका देऊन तो कार्डिक येथे एका दुसऱ्याच कोणत्या मुलीला डेट्स करत आहे. या प्रकारामुळे माझे हृय तुटले. मी कोलमडून गेले.'

निराश न होता झाली कार्यरत

शानायाने पुढे म्हटले आहे की, 'मी त्याच्यासोबत चार आठवडे थायलंड ट्रीप बुक केली होती. आम्ही केवळ एक दोस्त म्हणून तेथे गेलो. पण, नंतर माझ्या मनाने उभा राहण्याचा निर्णय घेतला. माझ्या वडिलांच्या मृत्यूमुळे मी मानसिकदृष्ट्या त्रस्त होते. माझ्या मनावर या मृत्यूचा विपरित परिणाम झाला होता.  त्यात माझा ब्रेकअप झाला. मी माझी भूकच गमावून बसली. छोट्या छोच्या गोष्टी आणण्यासाठीही मी गाडीचा वापर बंद केला. मी पाईच जाऊ लागले. मी पहिल्यांदाच इतकी कार्यरत झाली होते. ज्याचा परिणाम माझे वजन घटण्यावर झाला.'

शनाया सांगते की, 'मला कधीच वाटले नव्हते की, मी यातून उभा राहू शकेल. पण, आता मी एका अशा व्यक्तीसोबत आहे जो मला त्याच्यापेक्षा (एक्स) दसपटीने चांगले ठेवतो.' शनायच्या ट्विटला आतापर्यंत १ लाख १८ हजारांहून अधिक लाईक्स आल्या आहेत. तर, तिचे ट्विट १३ हजारंहून अधिक वेळा रिट्विट केले गेले आहे. लोकांनी तिच्या या हिम्मतीचे प्रचंड कौतूक केले आहे.