संभाजीराजेंच्या मनात चाललंय काय? शासकीय कार्यक्रमास अनुपस्थित राहून सरकारला इशारा?

Shivjayanti/Shivaji maharaj/shivneri : Sambhaji raje chatrapati update : आज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवजयंती निमित्त शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. मात्र ...

Updated: Feb 19, 2022, 10:43 AM IST
संभाजीराजेंच्या मनात चाललंय काय? शासकीय कार्यक्रमास अनुपस्थित राहून सरकारला इशारा?  title=

पुणे : आज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी शिवजयंती निमित्त शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. मात्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित न राहता ते तडक गड उतार झाले.

 शिवनेरीवर शिवजजयंती उत्सवासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, नामदार आदित्य ठाकरे, नामदार बाळासाहेब थोरात व नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासकीय सभेलाही उपस्थित राहणे संभाजीराजे यांनी जाणीवपूर्वक टाळले.

मराठा समाजाने केलेल्या मागण्या सरकारने मान्य करूनही आज 8 महिने उलटले तरी त्यांची अमलबजावणी केलेली नाही, म्हणून युवराज संभाजीराजे 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास बसणार आहेत. 

त्या पार्श्वभूमीवर युवराज संभाजीराजेंनी आज शासकीय कार्यक्रमातून काढता पाय घेऊन सरकारला नेमके काय सूचित केले, यावर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क सुरू झाले आहेत.