बस भरधाव वेगात अन् चालकाला आली फिट; परंतू या रणरागिनीने मोठ्या हिंमतीने वाचवले 22 प्रवाशांचे प्राण

Viral video pune woman drives bus : पुणे-अहमदनगर रस्त्यावर गुरुवारी एक थरार पाहायल मिळाला.  22 महिलांचा ग्रूप पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली इथं फिरायला जात असताना अचानक चालत्या बसमध्येच चालकाला फिट आली.

Updated: Jan 16, 2022, 12:20 PM IST
बस भरधाव वेगात अन् चालकाला आली फिट; परंतू या रणरागिनीने मोठ्या हिंमतीने वाचवले 22 प्रवाशांचे प्राण title=

पुणे : पुणे-अहमदनगर रस्त्यावर गुरुवारी एक थरार पाहायल मिळाला.  22 महिलांचा ग्रूप पुण्याच्या शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली इथं फिरायला जात असताना अचानक चालत्या बसमध्येच चालकाला फिट आली. बसमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. त्याचवेळी बसमधील एका महिलेने प्रसंगावधान दाखवत पुढाकार घेतला.

बसमधील योगिता सावत नावाच्या महिलेने तात्काळ पुढे येत स्वत: ड्रायव्हिंग सीटचा ताबा घेत स्टेअरिंग हाती घेतली, आणि प्रसंगावधान राखत योगिता सातव महिलांचा आधार बनल्या. बस चालवतानाच फिट आल्यामुळे चालक खाली पडला, त्याचे डोळे पांढरे झाले, हात पाय वाकडे झाले हे पाहून बसमधील सर्वच महिला घाबरल्या. 

त्यावेळी योगिता सातव यांनी धाडस करत बसचे स्टेअरिंग स्वत:च्या हातात घेऊन ड्रायव्हरला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी नेलं. आणि तर सर्व सहकारी महिलांना सुखरुप घरी पोहोचवले...अचानक उद्धभवलेल्या प्रसंगाचा धीराने सामना करत योगिता सातव यांनी परिस्थिती हाताळल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यापरिस्थितीबद्दल सांगताना योगिता सातव यांनी सांगितलं, परिस्थिती बिकट होती, चालक आणि महिलांचे प्राण वाचवण महत्त्वाचं होतं, त्यामुळे मी गांभीर्य लक्षात घेत स्टिअरिंग हाती घेतलं आणि चालकाला रुग्णालयापर्यंत नेलं.