बदललेल्या पॅटर्नविरोधात काही विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा पवित्रा; MPSCनेही दिला थेट इशारा

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेची पद्धत तसेच अभ्यासक्रमात बदल केल्याने काही विद्यार्थ्यांचा गट आक्रमक झाला होता.

Updated: Jul 25, 2022, 09:03 AM IST
बदललेल्या पॅटर्नविरोधात काही विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा पवित्रा; MPSCनेही दिला थेट इशारा title=

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेची पद्धत तसेच अभ्यासक्रमात बदल केल्याने काही विद्यार्थ्यांचा गट आक्रमक झाला असून त्यांनी आयोगाला आंदोलनाचा इशारा दिला होता. बदलेल्या परीक्षा पॅटर्न हा केंद्र लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेप्रमाणे असणार आहे. काही विद्यार्थ्यांनी या बदलाला विरोध करीत आंदोलनाचा इशारा दिला. परंतू MPSC नेच थेट आंदोलकांनाच इशारा दिला आहे. आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्यात येईल. असे आयोगाने म्हटले आहे.

यापुढे यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा होणार आहे. अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीत बदल झाल्याने विद्यार्थी आंदोलनाच्या प्रयत्नात आहेत. पण, त्याआधीच एमपीएससीनं इशारा दिल्याने विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

एमपीएससीच्या इशा-यानंतर विद्यार्थी बॅकफुटवर गेल्याचे दिसून येत आहे.. कारवाईच्या भीतीने आजचं पुण्यातील आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. परीक्षेच्या नव्या बदलांमुळे विद्यार्थ्यांचा विरोध असून. MPSCने परीक्षेसाठी तयारीला पुरेसा वेळ देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.