छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणातून : शरद पवार

Sharad Pawar On Babasaheb Purandare : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा बाबासाहेब पुरंदरेंवर निशाणा साधला आहे.

Updated: Jul 23, 2022, 04:21 PM IST
छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणातून : शरद पवार title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांचं लिखाणातून माझ्यामते शिवछञपती (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्यावर इतका अन्याय कोणी केला नाही. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला, अशी सडेतोड मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केलं. तसेच शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीमध्ये रामदास आणि दादोजी कोंडदेव यांच योगदान काय, असा सवालही पवारांनी यावेळेस उपस्थित केला. प्रा. श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचं प्रकाशन पवार यांच्या हस्ते पुण्यात झालं. यावेळेस ते बोलत होते. (ncp chief sharad pawar again critisize to indian historian babasaheb purandare at pune on chatrapati shivaji maharaj history) 

पवार काय म्हणाले? 

रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छ्त्रपती असा न करता 'कुळवाडी भूषण' असा केला. पण बाबासाहेब पुरंदरे यांनी खोटा इतिहास पसरवला. माझ्यामते शिवाजी महाराजांवर  इतका अन्याय कोणी केला नाही. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लिखाणातून छत्रपती शिवजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला", असंही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांनी नमूद केलं.

रामदास आणि दादोजी कोंडदेव यांचे योगदान काय? 

"अन्य घटकांचं महत्व वाढवण्याचे काम त्यांनी केलं. पण रामदासांचे योगदान काय, दादोजी कोंडदेवांचे योगदान काय? शिवाजी महाराजांना ज्यांनी दिशा दिल्या त्या फक्त जिजाऊ होत्या.  सत्य गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही", असंही पवारांनी स्पष्ट केलं.