मोये मोये...! 'धोनी माझ्या खिशात', पीटरसनच्या वक्तव्यावर जहीरला आठवला युवराज अन्...

 Kevin Pietersen vs Zaheer Khan: झहीर खान आणि केविन पीटरसन यांच्यात असं काही बोलणं झालं की अनेकांना हसू आवरणार (Moye Moye moment ) नाही.

| Feb 07, 2024, 16:32 PM IST

 Kevin Pietersen vs Zaheer Khan: झहीर खान आणि केविन पीटरसन यांच्यात असं काही बोलणं झालं की अनेकांना हसू आवरणार (Moye Moye moment ) नाही.

 

1/6

झहीर खान

विझाग (विशाखापट्टणम) येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीदरम्यान झहीर खान आणि केविन पीटरसन यांच्यात मजेदार शाब्दिक युद्ध झालं. 

2/6

पीटरसन

इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन हा टेस्ट मालिकेच्या समालोचनासाठी आला आहे. खरंतर केविन पीटरसन महेंद्रसिंग धोनीबद्दल काहीतरी बोलला होता. त्यावर जहीरने मजेशीर उत्तर दिलं.

3/6

महेंद्रसिंग धोनी

माझ्या खिशात पाकिस्तानच्या कामरान अकमल आणि महेंद्रसिंग धोनी देखील आहे, असं केविन म्हणतो. दोन्ही खेळाडूंच्या विकेट्स माझ्या नावावर आहेत, असं केविन पिटरसनला म्हणायचं होतं.

4/6

बोलती बंद

टीम इंडियाच्या खेळाडूला डिवचणं केपीला महागात पडलं. समोर उभ्या असलेल्या जहीरने केपीची बोलती बंद केली.

5/6

युवराज सिंग

केपीच्या वक्तव्यानंतर जहीरने थेट युवराज सिंगची आठवण काढली. खरं तर युवराज सिंग समोर पिटरसनला कधी मैदानात उभंच राहता आलं नाही.

6/6

चोप दिला

युवराजने अनेकदा केविन पिटरसनला घरचा रस्ता दाखवला आहे. तर त्याला कसोटी सामन्यात देखील युवराजने चांगलाच चोप दिला होता.