Year Ender 2023: यावर्षी Google वर सर्च झालेले टॉप 10 डेस्टिनेशन, भारताचं हे ठिकाण दुसऱ्या क्रमांकावर

Dec 12, 2023, 17:58 PM IST
1/10

व्हिएतनाम

2023 या वर्षात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या डेस्टिनेशनमध्ये लोकांची सर्वाधिक पसंती मिळाली ती व्हिएतनाम देशाला. सौंदर्याने नटलेल्या व्हिएतनाममध्ये अनेक ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. तसंच इथलं फूडही लोकांच्या पसंतीत पडणार आहे. या वर्षात तुमचं व्हिएतनाम पाहाचं राहिलं असेल तर नव्या वर्षात नक्कीच प्लान करा.

2/10

गोवा

टॉप 10 पर्यटन स्थळांमध्ये भारतीत गोवा हे ठिकाण दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोवा हे ठिकाणी हनीमूनसाठी फेव्हरेट मानलं जातं. तसंच सुट्टी घालवण्यासाठी लोकांची पहिली पसंती गोव्याला असते. इथले समुद्रकिनारे आणि संस्कृती पर्यटकांना आकर्षित करते. 

3/10

बाली

देवभूमी मानल्या जाणाऱ्या बालीला गेल्या काही वर्षात पर्यटकांची चांगलीच पसंती मिळत आहे. इथे नैसर्गिक सौंदर्याचा खजाना आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटकांचं बाली हे फेव्हरेट डेस्टिनेशन मानलं जातंय. 

4/10

श्रीलंका

टॉप-10 पर्यटनस्थळांमध्ये 2023 मध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या यादीत श्रीलंका चौथ्या स्थानावर आहे. निसर्गाने नटलेल्या या देशाला पुरातन संस्कृतिचा वारसा आहे. इथला निसर्ग आणि स्वच्छ-सुंदर समुद्रकिनारे पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक श्रीलंकेत येत असतात

5/10

थायलंड

थायलंडला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. इथली जंगलं, समुद्रकिनारे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शॉपिंग पर्यटकांना आकर्षिक करते. थायलंडमधली फुकेट, कोह पी, करावी सारखी ठिकाणं जगभरात प्रसिद्ध आहेत. 

6/10

काश्मीर

जमिनीवरचा स्वर्ग मानलं जाणारं ठिकाण म्हणजे काश्मिर. बर्फाने वेढलेल्या इथल्या सौंदर्याची पर्यटकांना भूरळ पडते. काश्मिरला यावर्षी सहाव्या क्रमांकाची पसंती मिळालीय.

7/10

कूर्ग

कर्नाटकमधलं कूर्ग हे सूंदर हिलस्टेशन पैकी एक आहे. इथली सुंदर धबधबे, किल्ले, संग्रहालय आणि निसर्गाने भरभरून दिलेलं सौंदर्य पाहण्यासारखं आहे. दरवर्षी लाखो पर्यटक कूर्गला भेट देतात.

8/10

अंदमान-निकोबार

अॅडव्हेंचरची पसंती असलेल्या पर्यटकांची पहिली पसंती असते ती अंदमान-निकोबार बेटाला. इथल्या नैसर्गिक सौंदर्यात भटकंती करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. 

9/10

इटली

जगात सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या परदेशी देशांमध्ये इटलीला पर्यटकांचं प्राधान्य आहे. गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या पर्यटन स्थळात इटली नवव्या क्रमांकावर आहे.   

10/10

स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंड हे नेहमीच प्रत्येकाचं ड्रीम डेस्टिनेशन आहे. इथलं नैसर्गिक सौंदर्य, सर्वत्र पसरलेली बर्फाची चादर आणि इथे दऱ्या-डोंगर पर्यटकांना आकर्षिक करतात.