Yuvraj Singh: टीम इंडियाचा तो योद्धा, ज्याने रक्ताच्या उलट्या होत असतानाही भारताला वर्ल्डकप जिंकवून दिला

Happy Birthday Yuvraj Singh: टीम इंडियाचा माी खेळाडू युवराज सिंग आज 42 वर्षांचा झाला आहे. सिक्सर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराजने टीमला अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले. यामध्ये 2007 टी-20 वर्ल्डकप आणि 2011 एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला होता.

| Dec 12, 2023, 13:09 PM IST
1/7

2011 च्या वर्ल्डकपमध्ये युवीने 362 रन्स केले होते. याशिवाय 15 महत्त्वपूर्ण विकेट्सही घेतले होते. 

2/7

2011 च्या वर्ल्डकपमध्ये त्याने दमदार कामगिरी केली पण त्याची अवस्था फारच बिकट झाली होती. 

3/7

त्या वर्ल्डकपमध्ये एक वेळ अशी आली होती की, रक्ताच्या उलट्या होत असताना त्याने फलंदाजी केली. 

4/7

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्वार्टर फायनल सामन्यात युवराजच्या तोंडातून रक्त येत होतं. युवराजला कॅन्सर झाल्याचा सुगावाही कुणाला नव्हता. 

5/7

तोंडातून रक्त येत असतानाही युवीने या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ६५ बॉल्समध्ये ५७ धावांची नाबाद मॅच-विनिंग इनिंग खेळली. 

6/7

यावेळी युवीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. भारताने हा सामना 5 विकेटने जिंकला.

7/7

अखेर बोस्टनमध्ये जाऊन युवीने कॅन्सरवर उपचार केले आणि ही लढाई जिंकली.