Health Tips In Marathi: अंड्याचा पिवळा बलक का खाऊ नये?

अंड आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. प्रोटीनचा विचार केल्यास अंड्यात जास्त प्रथिने असतात. मात्र, जर तुम्ही डाएटचा विचार करुन अंड आहारात समाविष्ट करत असाल तर त्याआधी जाणून घ्या की आहार कसा असायला हवा. 

| Dec 27, 2024, 19:20 PM IST

Boiled Eggs In Your Diet For Breakfast: अंड आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. प्रोटीनचा विचार केल्यास अंड्यात जास्त प्रथिने असतात. मात्र, जर तुम्ही डाएटचा विचार करुन अंड आहारात समाविष्ट करत असाल तर त्याआधी जाणून घ्या की आहार कसा असायला हवा. 

1/7

Health Tips In Marathi: अंड्याचा पिवळा बलक का खाऊ नये?

Health tips in marathi include boiled eggs in your diet for breakfast

तुम्हाला वजन कमी करायचाय पण त्यासाठी जिमबरोबरच आहारही परिपूर्ण घ्यावा लागतो. अंड्यात जसे प्रोटिन असते तसे कॅलरीदेखील असते.  100 ग्रॅम उकडलेल्या अंड्यातील सफेद भागात 52 कॅलरी असतात. पण संपूर्ण उकडलेल्या अंड्यात एकूण 155 कॅलरी असतात. 

2/7

अंड्याच्या सफेद भाग हा जास्त पौष्टिक असतो. तसंच, त्यात कॅलरीदेखील कमी असते. अंडी हे हृदयासाठीदेखील चांगले असतात. 

3/7

 अंड्यात सफेद भाग आणि पिवळा बलक अशा दोन्ही गोष्टी असतात. हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन, मिनरल्स असे पौष्टिक घटक असतात. मात्र, अंड्याच्या सफेद भागातत पिवळ्या बलकाच्या तुलनेने प्रोटिन कमी असले तरीदेखील फॅट कमी असतात. त्यामुळं कोलेस्ट्रॉलदेखील वाढत नाही. 

4/7

सफेद अंड्यात फॅट कमी असल्याने जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर हा पर्याय खूप चांगला आहे. मात्र, सर्वाधिक पौष्टिक घटक हे पिवळ्या बलकमध्ये असतात. त्यामुळं आरोग्य तज्ज्ञ संपूर्ण अंड खाण्याचा सल्ला देतात. 

5/7

पांढऱ्या भागाच्या तुलनेत संपूर्ण अंड्यात व्हिटॅमिन, मिनरल्स आणि हेल्दी फॅट्स असतात.

6/7

कॅलरी

अंड्याच्या पांढऱ्या भागात पिवळ्या बलकाच्या तुलनेने कॅलरी कमी असतात 

7/7

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही फक्त अंड्याचा सफेद भाग खाऊ शकता. तसंच, ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनीदेखील फक्त अंड्याचा सफेद भागच खाल्ला पाहिजे.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)