घरी दारु पार्टीसाठी लागतो परवाना? नशेत सापडल्यावर किती दंड? आत्ताच जाणून घ्या

Year Ended 2023: घरी आलेल्या पाहुण्यांना दारु देण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. नव वर्षात डोक्याला ताण नको असेल तर राज्य आणि शहराचे एक्साइज नियम-कायदे समजून घ्या.

| Dec 31, 2023, 11:11 AM IST

Year Ended 2023: घरी छोट्या पार्टीसाठी दारु बाळगण्यावर कोणती बंदी नाही. पण 9 लीटरपेक्षा जास्त दारु पिणार असाल तर परवाना आवश्यक आहे. यापेक्षा जास्त दारुचा वापर केला जात असेल तर एक्साइज डिपार्टमेंट दंड लावेल आणि दारु जप्त करेल. 

1/9

घरी दारु पार्टीसाठी लागतो परवाना? नशेत सापडल्यावर किती दंड? आत्ताच जाणून घ्या

Year Ended 2023 How Much Liquor License Needed Police fine found drunk

Liquor Policy: देशासह जगभरातील नागरिक 2023 वर्षाचा अखेर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. सर्वजण मित्र परिवारासोबत पार्ट्यांचे प्लान आखत आहेत. कोणी घरी, हॉटेल तर कोणी फार्म हाऊसवर नव वर्षाच्या पार्टीच्या तयारीला लागला आहे. तुम्ही देखील या पार्ट्यांमध्ये पाहुण्यांना दारु देण्याचा विचार करत असाल तर थोडं संभाळून. 

2/9

परवान्याची आवश्यकता

Year Ended 2023 How Much Liquor License Needed Police fine found drunk

घरी आलेल्या पाहुण्यांना दारु देण्यासाठी परवान्याची आवश्यकता असते. नव वर्षात डोक्याला ताण नको असेल तर राज्य आणि शहराचे एक्साइज नियम-कायदे समजून घ्या.

3/9

दारु जप्त

Year Ended 2023 How Much Liquor License Needed Police fine found drunk

घरी छोट्या पार्टीसाठी दारु बाळगण्यावर कोणती बंदी नाही. पण 9 लीटरपेक्षा जास्त दारु पिणार असाल तर परवाना आवश्यक आहे. यापेक्षा जास्त दारुचा वापर केला जात असेल तर एक्साइज डिपार्टमेंट दंड लावेल आणि दारु जप्त करेल. 

4/9

पी10 लायसन्स

Year Ended 2023 How Much Liquor License Needed Police fine found drunk

प्रायव्हेट पार्टी, लग्न समारंभात हार्ड ड्रिंकसाठी परवाना आवश्यक आहे. याला पी10 लायसन्स म्हणतात. यासाठी कार्यक्रमाच्या आठवडाभर आधी अर्ज द्यावा लागतो. बेंक्वेट हॉल, मोटेल, फार्म हाऊसमध्ये पी10 परवान्यासाठी 15 हजार रुपये शुल्क आहे. दुसऱ्या जागांसाठी 5 हजार रुपये आहे. प्रायव्हेट पार्टी, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये इव्हेंटसाठी 10 हजार रुपये खर्च येतो. 

5/9

दंगा करणाऱ्यांनाही हा दंड

Year Ended 2023 How Much Liquor License Needed Police fine found drunk

सार्वजनिक ठिकाणी कोणची दारु पिऊ शकत नाही. अनेक राज्यांमध्ये यासंदर्भात वेगवेगळे कडक कायदे आहेत. पब्लिक प्लेसमध्ये दारु पिताना आढळल्यास 5 हजार रुपये दंड आहे. दारु पिऊन रस्ते, पार्क, दुकानांजवळ दंगा करणाऱ्यांनाही हा दंड आहे. 

6/9

10 हजार रुपये दंड

Year Ended 2023 How Much Liquor License Needed Police fine found drunk

रस्त्याच्या बाजुला कार लावून दारु पिणे गुन्हा आहे. कारच्या आत दारुच्या खुल्या बॉटलही ठेवू नयेत. 100 एमएल रक्तात 30 एमएल अल्कोहोल सापडले तर 10 हजार रुपये दंड आणि 6 महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो. दुसऱ्यांदा पकडले गेल्यास 15 हजार दंड आणि 2 वर्षाची जेल होऊ शकते. तिसऱ्यांदा पकडले गेल्यास ड्रायव्हिंग लायसन्स रद्द केले जाते. 

7/9

कमी अल्कोहोल असणारी दारु

Year Ended 2023 How Much Liquor License Needed Police fine found drunk

प्रत्येक राज्यात दारु पिण्याचे वय निर्धारित करण्यात आले आहे. जास्त अल्कोहोलवाली दारु पिण्यासाठी वेगळे वय आणि कमी अल्कोहोल असणारी दारु पिण्यासाठी वेगळे वय आहे. 

8/9

25 वर्षाच्या आतील तरुण

Year Ended 2023 How Much Liquor License Needed Police fine found drunk

महाराष्ट्रात 25 वर्षाच्या आतील तरुण दारु पिताना आढळल्यास कारवाई होऊ शकते. 5 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोल असेल तर 21 वर्षाखालील तरुण कायद्याने ते पिऊ शकत नाहीत. 

9/9

तर परवानगी आवश्यक

Year Ended 2023 How Much Liquor License Needed Police fine found drunk

एखादा व्यक्ती घरी दारु ठेवू शकतो पण जास्त प्रमाणात नाही. जर घरी 8 ते 10 लोकांची पार्टी आहे तर परवान्याची गरज नाही. पण कोणती तक्रार यायला नको. मोठा इव्हेंट असेल आणि बिल्डिंग कम्पाऊंड, टेरेस्ट, लाऊजमध्ये हार्ड ड्रिंक असेल तर परवानगी आवश्यक आहे.