Yashasvi Jaiswal House: 5 BHK च्या आलीशान घराचा मालक आहे यशस्वी, बघा इनसाईड फोटोज...

Yashasvi jaiswal Mumbai House: टीम इंडियाचा प्रतिभावान फलंदाज यशस्वी जयस्वाल इंग्लंड विरुद्ध सध्या चालू असणाऱ्य़ा टेस्ट सिरीजमध्ये आपला कमाल दाखवत आहे. या सिरीजमध्ये यशस्वी ने 100 पेक्षा जास्तच्या अॅव्हरेज ने 500 हून अधिक धावा बनवून इंग्लंड संघाचा कस काढत आहे. हा 22 वर्षीय कौशल्यवान फलंदाज नुकताच आपल्या कुटूंबासोबत मुंबईच्या एका आलीशान घरात राहायला गेला आहे. बघा त्याच्या या 5 BHK अपार्टमेंटची अविस्मरणीय फोटोज.

Feb 20, 2024, 14:45 PM IST
1/8

यशस्वी जयस्वाल इंग्लंड विरूद्ध सुरू असलेल्या टेस्ट सिरीज मध्ये कमालीची कामगिरी करत आहे. या 22 वर्षीय फलंदाजासमोर इंग्लंडचे गोलंदाज चारीमुंड्या चीत झाले. यशस्वीने या सामन्याचा दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 214 धावांची पाळी खेळली. याआधी ही यशस्वी जयस्वालने विशाखापट्टनम येथे  डबल सेंच्युरी झळकावली होती. आतापर्यंत त्याने तिघं मॅचेस मिळून 6 इनिंग मध्ये 545 धावा बनवून चुकला आहे.

2/8

भेळपुरी च्या गाडीवर काम करण्यापासून तर 5 बेडरूम च्या घरापर्यंतचा यशस्वी जयस्वाल चा प्रवास जणू काही एक स्वप्नचं आहे. पण हे स्वप्न यशस्वीने वास्तवात साकार करून दाखवले आहे.

3/8

मुंबईच्या ठाणे परिसरात यशस्वी जयस्वालचे 1500 स्केअर फुटचे घर आहे. या घराला पूर्णपणे युरोपियन स्टाईलमध्ये डिजाइन केले गेलेले आहे.  

4/8

यशस्वी चे नवे घर Nesterra Home Decor यांनी सजविले आहे. आपल्या घराचे फोटो शेअर करत यशस्वी जयस्वाल म्हणाला की, मी जणू एक स्वर्गात प्रवेश करत आहे, जेथे प्रत्येक गोष्ट माझ्या पर्सनॅलिटीला दर्शविते  

5/8

यशस्वी जयस्वालच्या आलीशान अपार्टमेंटमध्ये ती प्रत्येक गोष्ट आहे जी या घराला वेगळी बनवते. लिवींग रूम हा अतिशय आरामदायी असून, किचन खुप सुंदर आहे. मास्टर बेडरूमला बाथटब पण अटॅच आहे. 

6/8

यशस्वी जायसवालने भारताच्या टी-20 आणि टेस्ट टीममध्ये पदार्पण केले आहे आणि आतापर्यंत धावांचा वर्षाव केला आहे. 7 टेस्ट सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 70 च्या सरासरीने 861 धावा आहेत. यात 2 दुहेरी शतके, 3 शतके आणि 2 अर्धशतके समाविष्ट आहेत. त्याच वेळी, 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 160 च्या स्ट्राइक रेटने 4 अर्धशतके आणि 1 शतकासह 502 धावा केल्या आहेत.  

7/8

यशस्वी जायसवालने आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने 14 सामन्यांत 163.61 च्या धक्कादायक सरासरीने 625 धावा केल्या. यात 1 शतक आणि 5 अर्धशतके समाविष्ट होती. या प्रदर्शनाच्या दमावर त्याला भारताच्या टेस्ट आणि टी20 संघात स्थान मिळालं

8/8

यशस्वी जायसवालने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. 22 प्रथम श्रेणी सामन्यांच्या 39 डावांमध्ये त्याने 2706 धावा केल्या आहेत. 77.31 च्या उत्कृष्ट सरासरीने त्याने हे धावा केले आहेत. यात त्याच्या बॅटने 12 शतके आणि 4 अर्धशतकेही झळकली आहेत. त्याचा सर्वोच्च स्कोर 265 धावा आहे