Tesla च्या आधी Xiaomi ची भारतात Entry! लाँच करणार इलेक्ट्रीक कार; सिंगल चार्जमध्ये 800 km इतकी रेंज

Tesla च्या आधी आपली  इलेक्ट्रीक कार भारतात लाँच  करण्याची तयारी Xiaomi कंपनीने केली आहे. जाणून घेऊया भारतात कधी लाँच होणार Xiaomi SU7 कार.  

Jul 06, 2024, 21:39 PM IST

Xiaomi SU7 :  स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये भारतात दबदबा असणारी Xiaomi कंपनीने आता ऑटोमोबाईल क्षेत्रात पदार्पण केले आहे. Tesla च्या आधी Xiaomi कंपनी भारतात Entry करणार आहे. Tesla च्या आधी Xiaomi कंपनी आपली  इलेक्ट्रीक कार भारतात लाँच करणार आहे. 

1/7

Xiaomi ची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर भारतात लाँच होणार आहे.  Xiaomi SU7 असे कारचे नाव आहे. लाँचिंगच्या आधीच या कारचे फोटो व्हायरल झाले होते. 

2/7

Xiaomi SU7 इलेक्ट्रिक कार भारतात कधी लाँच होमार याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, 9 जुलै रोजी बेंगळुरूमध्ये  एका इव्हेंटमध्ये Xiaomi SU7 इलेक्ट्रिक कार शोकेस केली जाणार असल्याची चर्चा आहे. 

3/7

Xiaomi SU7 इलेक्ट्रिक कारची स्टार्टिंग प्राईज 215,900 युआन ते 299,900 युआन म्हणजे भारतीय चलनानुसार  25 ते 30 लाख रुपये इतकी आहे. या कारची किंमत चीनमधील टेस्ला मॉडेल 3 पेक्षा कमी आहे.  

4/7

या कारच्या बेस मॉडेलचे वजन 1,980 किलो आहे. लोअर ट्रिमचा टॉप स्पीड 210 km प्रति तास असा आहे. टॉप मॉडेलचे वजन 2,205 किलो आहे . याचा टॉप स्पीड 265  km प्रति तास असा आहे.  बेस मॉडेलमध्ये 73.6kW  क्षमतेची बॅटरी आहे. यात 668 किमीपर्यंतची ड्रायव्हिग रेंज मिळते. तर, टॉप मॉडेलमध्ये 101kWh क्षमतेची बॅटरी आहे. यात सिंगल चार्जमध्ये 800 किमीची रेंज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.  

5/7

Xiaomi SU7 कार ही 4997 मिमी लांब, 1,963 मिमी रुंद आणि 1455 मिमी उंच आहे.  Xiaomi SU7 इलेक्ट्रिक सेडान कारमध्ये स्मार्टफोन प्रमाणे फेस रेकग्निशन लॉक/अनलॉक सिस्टीम देण्यात आली आहे.     

6/7

 बीजिंग ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री होल्डिंग कंपनी लिमिटेड (BAIC) यांच्याच्या मदतीने Xiaomi SU7 कारची निर्मीती केली आहे. 

7/7

Xiaomi SU7 ही कार चीनमध्ये लाँच झाली आहे. लवकरच ही कार भारतात लाँच केली जाणार आहे.  Tesla च्या आधी Xiaomi कंपनी आपली कार लाँच करणार आहे.