'केदारनाथ'ची wrap up party !

Jul 02, 2018, 17:40 PM IST
1/7

Kedarnath

Kedarnath

सैफअली खान आणि अमृता सिंंगची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. 'केदारनाथ' या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. 'केदारनाथ'चे दिग्दर्शन अभिषेक कपूरने केले आहे.   

2/7

Kedarnath

Kedarnath

सारा अली खानसोबत अभिनेता सुशांंत सिंग राजपूत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. 'केदारनाथ'च्या टीमने मुंबईत शूटिंग संपल्यानंतर खास सेलिब्रेशन केले आहे.  

3/7

Kedarnath

Kedarnath

दरम्यान केदारनाथ चित्रपटाबाबत काही वाद रंगले होते. त्यामुळे शूटिंगही काही काळ लांंबले होते. मात्र अखेर वाद बाजूला ठेवून या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले आहे. 

4/7

Kedarnath

Kedarnath

क्रिअर्ज एंटरटेनमेंट आणि पूजा फिल्म्सच्या बॅनरखाली रॉनी स्क्रूवाला आणि अभिषेक कपूर हा चित्रपट बनवत आहे. 

5/7

Kedarnath

Kedarnath

सारा अली खान सध्या रोहित शेट्टीच्या `सिंबा`या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.  सिंंबामध्ये सारासोबत रणवीर सिंह दिसणार आहे.   

6/7

Kedarnath

Kedarnath

काही दिवसांपूर्वी बी टाउन पार्ट्यांंमध्येही सारा अली खान हमखास दिसते. एका लग्न सोहळ्यातील 'सात समुंदर पार...' या गाण्यावर थिरकताना तिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

7/7

Kedarnath

Kedarnath

'केदारनाथ' या सिनेमा यंदा नोव्हेंंबर महिन्यात  प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.