भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल

भारतात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज वरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया. 

वनिता कांबळे | Jul 04, 2024, 00:04 AM IST

 Chenab Railway Bridge :  भारतीय इंजिनियर्सनी कमाल केली आहे.  जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज भारतात तयार झाला आहे. काश्मीरच्या अत्यंत दुर्गम चिनाब रेल्वे ब्रीज बांधण्यात आला आहे. आयफेल टॉवरपेक्षा उंच आणि इंद्रधनुष्यासारखी कमान असलेला हा पूल जगातलं एक आश्चर्य ठरणार आहे.  नुकतीच या  ब्रिजवरुन रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली. या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.

1/7

बनिहालदरम्यान रियासी इथं चिनाब नदीवर तब्बल 359 मीटर उंचीवर  हा ब्रिज उभारण्यात आलाय. तर या ब्रिजची मुख्य कमान 467 मीटर इतकी आहे.

2/7

 ट्रायल दरम्यान या मार्गावरुन 100 च्या स्पीडने रेल्वे धावली. प्रत्यक्षात मात्र, या मार्गावरुन 85 KM प्रतितास इतक्या स्पीडने रेल्वे धावणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.  मात्र, याबाबत रेल्वेकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

3/7

या ब्रिजवरुन रेल्वे इंजिनची चाचणी घेणं सुरु झाली आहे. त्याचाच भाग म्हणून या मार्गावर 16 जून 2024 रोजी सांगलदान-रियासी लिंकची ट्रायल रन घेतली. 

4/7

ब्रिज चिनाब नदीवर तब्बल 359 मीटर उंचीवर उभारण्यात आलाय. तर या ब्रिजची मुख्य कमान 467 मीटर इतकी आहे.  

5/7

या ब्रिजमुळे जम्मू काश्मीरची दळणवळण यंत्रणा आणकी भक्कम होणार आहे. पर्यटनालाही यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.     

6/7

अतिवेगवान वारे, तसंच भूकंपरोधक अशी याची रचना आहे. आंतरराष्ट्रीय स्तराच्या वेल्डिंगचा यासाठी वापर करण्यात आला.  

7/7

हा पुल कुतुबमीनारच्याही 5 पट अधिक उंच आहे. तर,  पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटरहून जास्त याची उंची आहे.