पाहा जगातील Underground हॉटेल; इथं मिळतेय निसर्गाच्या कुशीत राहण्याची संधी

इथं कुठे आपण एकसारंख येणार आहोत? असं म्हणत मग शोध सुरु होता एका भन्नाट Stay Option चा. तुम्हीही अशाच शोधात असाल तर, एक जगावेगळा पर्याय तुमची वाट पाहतोय. 

Jul 05, 2023, 16:56 PM IST

World's Deepest Hotel : आपण ज्यावेळी एखाद्या नव्या ठिकाणी भटकंतीसाठी जातो तेव्हा तिथं राहण्यासाठी उत्तमोत्तम पर्याय निवडण्याकडेच आपला कल असतो. 

1/7

The Deep Sleep Hotel

worlds deepest hotel and overnight stay photos and location plan a vacation

इथं तुम्हाला शब्दश: निसर्गाच्या कुशीत राहण्याची संधी मिळेल. कारण हे आहे जगातील सर्वाधिक खोलीवर असणारं एक हॉटेल. world's deepest hotel म्हणून त्याची सध्या जगभरात चर्चा सुरु असून, The Deep Sleep Hotel असं त्याचं नाव. UK मध्ये असणारं हे हॉटेल भूभागापासून 400 मीटर खोलीवर आहे.  (छाया सौजन्य- बीबीसी न्यूज) 

2/7

किंमत

worlds deepest hotel and overnight stay photos and location plan a vacation

थेट किमतीचंच म्हणावं तर, अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार या हॉटेलमध्ये राहण्यासाठी तुम्हाला एका रात्रीच्या वास्तव्यासाठी प्रायव्हेट केबिन घ्यायचं झालं तर, साधारण 350 पाऊंड म्हणजेच 36003 रुपये भरावे लागतील. तर, दोन व्यक्तींसाठी Grotto ची किंमत 550 पाऊंड म्हणजेच 56577 रुपये भरावे लागतील.  (छाया सौजन्य- बीबीसी न्यूज) 

3/7

खाणीत हॉटेल...

worlds deepest hotel and overnight stay photos and location plan a vacation

हे हॉटेल एका खाणीमध्ये उभारण्यात आलं असून, ही विक्टोरियन पद्धतीची खाण नॉर्थ वेल्स येथील  Eryri National Park च्या स्नोडोनिया येथील डोंगरांमध्ये दडली आहे. इथं चार प्रायव्हेट ट्विन बेड केबिन आणि एक रोमँटिक डबल बेड ग्रोटो (खासगी रुम) अशी सुविधा आहे.   (छाया सौजन्य- बीबीसी न्यूज) 

4/7

निसर्गाच्या कुशीत

worlds deepest hotel and overnight stay photos and location plan a vacation

तुम्ही इथं एक आठवड्यासाठीसुद्धा राहू शकता आणि अगदी एका रात्रीसाठीसुद्धा राहू शकता. बरं, इथून परतल्यानंतर तुम्ही इतरांना सांगायला मोकळे, की 'आम्ही नुकतेच निसर्गाच्या कुशीत राहून आलो.'  (छाया सौजन्य- बीबीसी न्यूज) 

5/7

ट्रेक

worlds deepest hotel and overnight stay photos and location plan a vacation

या हॉटेलपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला एका विक्टोरियन खाणीच्या वाटेवरून थरारक ट्रेक करत यावं लागणार आहे. इथं तुम्हाला वाटाड्या सोबत देईल. अनेक जुने पूल, विहिरी आणि जुन्या काळातील बांधकाम तुम्हाला या वाटेवर पाहण्याची संधी मिळेल.   (छाया सौजन्य- बीबीसी न्यूज) 

6/7

माहिती

worlds deepest hotel and overnight stay photos and location plan a vacation

साधारण तासाभराच्या या प्रवासात वाटाड्या तुम्हाला माहिती देताना दिसेल. यावेळी तुम्हाला लाईट असणारं हेल्मेट, हार्नेस आणि संरक्षक बूटही देण्यात येतील.  (छाया सौजन्य- बीबीसी न्यूज) 

7/7

खाण्यापिण्याची सोय

worlds deepest hotel and overnight stay photos and location plan a vacation

इथं भेट दिली असता तुम्हाला इथल्या गारव्याशी दोन हात करता येईल असं गरम पेय, तुमच्या प्रवासाचा थकवा दूर करेल असं जेवण complimentary  देण्यात येईल. इथं तुम्ही व्हिगन आणि शाकाहारी असे पर्याय निवडू शकता. काय मग, कधी भेट देताय? (छाया सौजन्य- फ्रिपिक)