'साराभाई वर्सेस साराभाई' ते 'कपिल शर्मा शो'पर्यंत हे Comedy Show तुम्ही पाहिलेत का?

Comedy Show world laughter day : आज 7 मे रोजी वर्ल्ड लाफ्टर डे आहे. हसणं आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपण आनंदी राहिलो तर आपला दिवस आनंदीमय जातो. आज आपण अशा काही मालिकांविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी सगळ्यांना वेड लावलं होतं. अनेकांना हसायला शिकवलं तर अनेकांना डिप्रेशनमधून बाहेर येण्यास मदत केली. चला तर जाणून घेऊया त्या मालिकांविषयी...

| May 07, 2023, 19:01 PM IST
1/7

हम पांच

Comedy Show world laughter day

पाच बहिणींच्या या कार्यक्रमानं सगळ्यांना हसवून सोडलं होतं. या मालिकेत अशोक सराफ, शोमा आनंद, भैरवी रिछारिया, राखी टंडन, विद्या बालन यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. तर ही मालिका  1995 साली प्रदर्शित झाली होती, तर 2006 पर्यंत ही मालिका छोट्या पडद्यावर प्रेक्षकांनी पाहिली. 

2/7

खिचडी

Comedy Show world laughter day

छोट्या पडद्यावरील सर्वात मजेदार मालिका म्हणजे एक गुजराती कुटुंबं. या मालिकेनं 2002 ते 2004 पर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या मालिकेत, अंगद देसाई, सुप्रिया पाठक, राजीव मेहता यांच्यासह अनेक कलाकार होते. 

3/7

साराभाई वर्सेस साराभाई

Comedy Show world laughter day

साराभाई वर्सेस साराभाई या कॉमेडी मालिकेत सासु-सुनेतील जबरदस्त कॉमेडी पाहायला मिळाली आहे. ही मालिका 2004 ते 2017 या काळात प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. या मालिकेत सतीश शाह, रत्ना पाठक, रूपाली गांगुली, सुमीत राघवन हे कलाकार होते. 

4/7

देख भाई देख

Comedy Show world laughter day

1993 साली प्रदर्शित झालेला देख भाई देख हा एक खूप कॉमेडी शो होता. या मालिकेतशेखर सुमन, नवीन निश्चल, फरीदा जलाल, सुषमा सेठ, भावना बलसारा हे कलाकार होते. 

5/7

तारक मेहता का उल्टा चष्मा

Comedy Show world laughter day

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका 2008 साली प्रदर्शित झाली होती. ही मालिका आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

6/7

वागले की दुनिया

Comedy Show world laughter day

2021 साली ही मालिका प्रदर्शित झाली होती. या मालिकेत सुमित राघवन, परिवा प्रणति, अंजन श्रीवास्तव, भारती आचरेकर, चिन्मयी होते. 

7/7

द कपिल शर्मा शो

Comedy Show world laughter day

2016 साली सुरु झालेला हा शो आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात सगळे सेलिब्रिटी देखील त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचतात.  या कार्यक्रमात कपिल शर्मासोबत, सुमोना चक्रवर्ती, कीकू शारदा, कृष्णा अभिषेक आणखी अनेक कलाकारा आहेत.