World Cup 2019 : INDvBAN भारतीय खेळाडूंना ‘या’ आजींचा आशीर्वाद!

Jul 03, 2019, 10:18 AM IST
1/6

World Cup 2019 : INDvBAN भारतीय खेळाडूंना ‘या’ आजींचा आशीर्वाद!

मंगळवारी ICC World Cup 2019 मध्ये भारत आणि बांगलादेश या दोन्ही राष्ट्रांमध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने खेळाडूंच्या अतिशय संतुलित खेळाच्या बळावर २८ धावांनी विरोधी संघावर विजय मिळवला. या विजयासह भारताच्या क्रिकेट संघाने यंदाच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. INDvBAN क्रिकेट सामन्यात रोहित शर्माच्या शतकी खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकली, जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीने साऱ्यांनाच अवाक् केलं. या साऱ्यामध्ये खेळाडूंना असंख्य प्रेक्षकांमधून प्रोत्साहन देत होत्या एक आजी. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)

2/6

World Cup 2019 : INDvBAN भारतीय खेळाडूंना ‘या’ आजींचा आशीर्वाद!

मैदानात फिरणाऱ्या कॅमेऱ्याने आजीबाईंची एक झलक टीपली आणि पाहता पाहता सोशल मीडियावरही त्यांचीच चर्चा सुरु झाली. मोठ्या उत्साहाने सामन्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेणाऱ्या या आजी सर्वांच्याच ‘फेव्हरेट लिस्ट’चा एक भाग झाल्या. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)

3/6

World Cup 2019 : INDvBAN भारतीय खेळाडूंना ‘या’ आजींचा आशीर्वाद!

८७ वर्षांच्या भारतीय क्रिकेट संघात्या या आजींचं नाव आहे चारुलता पटेल. आपण भारताच्या सामन्यांच्या वेळी अनेकदा उपस्थिती लावत खेळाडूंसाठी प्रार्थना करत असल्याचं त्या स्वत: वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हणाल्या. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)

4/6

World Cup 2019 : INDvBAN भारतीय खेळाडूंना ‘या’ आजींचा आशीर्वाद!

आजींचा उत्साह आणि खेळाप्रती त्यांची आत्मियता पाहून विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनीही आजींची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मोठ्या प्रेमाने या दोन्ही खेळाडूंना आणि संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाला आशीर्वाद दिले. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)

5/6

World Cup 2019 : INDvBAN भारतीय खेळाडूंना ‘या’ आजींचा आशीर्वाद!

विराटने आजींसोबतचे फोटो त्याच्या सोशल मीडियावरही पोस्ट केले. ‘वाढतं वय हा फक्त एक आकडा आहे. कोणत्याही गोष्टीप्रती असणाऱी आत्मियता आणि समर्पकता सर्व सीमा ओलांडण्यास मदत करतात. त्यांच्या डोळ्यांत संपूर्ण भारतीय संघासाठी अपार प्रेम आणि खुप साऱ्या आशीर्वादाच्याच भावना मी पाहिल्या’, असं कॅप्शन त्याने या फोटोसाठी लिहीत आजींचे आभार मानले. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)

6/6

World Cup 2019 : INDvBAN भारतीय खेळाडूंना ‘या’ आजींचा आशीर्वाद!

भारतात क्रिकेटला देवत्व प्राप्त आहे. अबालवृद्धांमध्ये या खेळाप्रती प्रचंड उत्सुकता आणि उत्साह पाहायला मिळतो. क्रिकेट सामन्यांनध्ये याचा अनेकदा प्रत्ययही येतो. पण, या आजींचा उत्साह मात्र अवघ्या काही शब्दांमध्ये मांडणंही निव्वळ अशक्यच. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)