IND vs Aus : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात विराट कोहली तोडणार सचिनचा रेकॉर्ड?

भारताचा महान फलंदाज विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अशा परिस्थितीत त्याला बॉर्डर गावस्कर सिरीजमध्ये आणखी एक मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.

Feb 09, 2023, 19:42 PM IST
1/5

विराट कोहलीने 15 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये इतके रन्स केलेत की, आता तो जेव्हा जेव्हा मैदानात येतो तेव्हा त्याच्या नावे अजून एका विक्रमाची नोंद होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात विराटकडे अजून एक रेकॉर्ड करण्याची संधी आहे. 

2/5

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यात विराट कोहलीने 64 रन्स केले तर तो एक मोठा रेकॉर्ड त्याच्या नावावर करणार आहे.

3/5

कोहलीने 64 रन्स केल्याने तो त्याच्या कारकिर्दीत 25 हजार रन्सचा टप्पा पूर्ण करणार आहे.

4/5

विराट कोहलीच्या नावे सध्या 24936 आंतरराष्ट्रीय रन्सची नोंद आहे.

5/5

कोहलीने नागपुरच्या टेस्टमध्ये 64 रन्स केले तर सचिन तेंडुलकरनंतर 25 हजार रन्स करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरेल.