भारतात आता धावणार Air Train, प्रकल्पासाठी 2000 कोटींचा खर्च पण प्रवाशांसाठी मोफत प्रवास...पाहा मार्ग आणि स्टॉप

What is Air Train : भारतात लवकरच एअर ट्रेन धावणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी 2000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पण या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना पैसे द्यावे लागणार नाहीत. या ट्रेनमधून मोफत प्रवास करता येणार आहे.

| Sep 30, 2024, 14:48 PM IST
1/7

भारतात आता धावणार Air Train, प्रकल्पासाठी 2000 कोटींचा खर्च पण प्रवाशांसाठी मोफत प्रवास...पाहा मार्ग आणि स्टॉप

2/7

रेल्वे ही भारताची लाईफ लाईन मानली जाते. देशात दररोज जवळपास दोन ते अडीच कोटी लोकं ट्रेनने प्रवास करतात. देशभरात रेल्वेचं जाळं विस्तारलं आहे. यात, लोकल, एक्स्प्रेस, सुपरपास्ट, मेले अशा अनेक प्रकारच्या ट्रेनचा समावेश आहे. पण आता देशात लवकरच एअर ट्रेन धावणार आहे.

3/7

भारतात धावणारी एअर ट्रेन स्पेशल असणार आहे. ही ट्रेन पूर्णपण ऑटोमेटिक सिस्टमवर काम करणार आहे. दिल्ली विमानतळावरील कनेक्टिव्हिटी सुधारणं हा या ट्रेनचा उद्देश आहे. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर ट्रेन वेगवेगळ्या टर्मिनल्सना जोडण्यासाठी काम करेल.

4/7

दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एक, दोन आणि तीन टर्मिनलदरम्यानच्या जवळपास 7.5 किलोमीटरचं अंतर एअर ट्रेनने पार करणं सोप होणार आहे.

5/7

दिल्ली विमानतळवरील टर्मिनल एकवरुन टर्मिनल दोन आणि तीन दरम्यान ही एअर ट्रेन धावेल. हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा प्रकल्पाचा अंदाजीत खर्च 2000 कोटी रुपये इतका आहे.

6/7

एअर ट्रेनने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना खिसा रिकामा करण्याची गरज नाही. दिल्ली विमानतळावर आलेले प्रवासी या एअर ट्रेनने मोफत प्रवास करु शकणार आहेत. भारतातील व्यस्त विमानतळांपैकी दिल्ली विमानतळ हे एक आहे. दरवर्षी या विमानतळावरुन अंदाजे सात कोटी प्रवासी प्रवास करतात. पुढच्या काही वर्षात ही संख्या आणखी वाढणार आहे.

7/7

एअर ट्रेन सुरु झाल्यास प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. दिल्ली विमानतळावर सध्या एका टर्निमलहून दुसऱ्या टर्मिनलला पोहोचण्यासाठी दिल्ली ट्रान्सपोर्टच्या शटल बसने प्रवास करावा लागतो. एअर ट्रेनने दिल्ली विमानतळावरचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.