Vinesh Phogat : 'मी मानसिकदृष्ट्या खचलीये, माझ्यासोबत जे झालं...', निवृत्तीवर विनेश फोगाट स्पष्टच म्हणाली

Vinesh phogat Reconsider Retirement : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत भारताला मोठा धक्का बसला. कुस्तीपटू विनेश फोगाटचं वजन 100 ग्रँम जास्त बसलं म्हणून तिला डिक्वॉलिफाय करण्यात आलं होतं. मात्र, भारतात तिचं चॅम्पियन सारखं स्वागत करण्यात आलं. 

| Aug 26, 2024, 00:03 AM IST
1/5

तडकाफडकी निवृत्ती

ऑलिम्पिकमधून मोकळ्या हातांनी परतल्यानंतर विनेशने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली होती. आता निवृत्ती मागे घेणार का? असा प्रश्न विनेशला विचारला गेला. त्यावर तिने स्पष्ट उत्तर दिलं.  

2/5

माझ्यासोबत जे झालं...

मला आता काहीही वाटत नाही. पण विचार मनात वेगवेगळे सुरू आहेत. कोणत्याही खेळाडूला खेळ सोडणं अवघड असतं. माझ्यासोबत जे झालं, त्यामुळे भाविनकदृष्ट्या मी खचून गेले, असं विनेश म्हणाली.   

3/5

मानसिक लेवल

भाविनक गोष्टीतून बाहेर कसं येयचं, हे मला माहिती नाहीये. माझा मूड ठीक आहे पण मानसिक लेवल ठीक नाहीये, याची मला जाणीव होत आहे, असं म्हणत विनेश भावूक झाली.

4/5

जेव्हा मी शांत होईल तेव्हा...

जेव्हा मी शांत होईल, तेव्हा मी माझ्या करियरविषयी विचार करू शकते. लोकांचं प्रेम मिळतंय, हे पाहून मला देखील आनंद होतोय, असं विनेश म्हणते.

5/5

मेडल न मिळण्याचं दु:ख

एकीकडे लोकांचं प्रेम मिळतंय अन् दुसरीकडे मेडल न मिळण्याचं दु:ख देखील आहे. शरीर व्यवस्थित काम करतंय पण मानसिकदृष्ट्या ठीक होण्याचा प्रयत्न करतीये, असंही विनेश म्हणाली.