कोकण म्हणजे स्वर्ग! याच स्वर्गाला टक्कर देतेय राजधानी सातारा; पश्चिम महाराष्ट्रातील लोप्रिय पर्यटन स्थळ

पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ. इथलं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहिनी घालते.   

| Aug 25, 2024, 23:42 PM IST

Satara Mahabaleshwar Tourism :  चैतन्य म्हणजे काय.... सुख म्हणजे काय... याचा प्रत्यक्षात अनुभव सातारा जिल्ह्यातील या लोकप्रिय पर्यटन स्थळावर फिरताना येतो. हे लोकप्रिय पर्यटन कोकणला टक्कर देते.  जाणून घेऊया या पर्यटनस्थळा विषयी.

1/7

महाराष्ट्रातील कोकण हे परदेशातील पर्यटनस्थळांना टक्कर देते. कोकणासह महाराष्ट्रातील साताऱ्या जिल्ह्यात देखील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. जे मिनी काश्मिर म्हणून देखील ओळखले जाते.

2/7

धोम धरण तसेच  कोयनेच्या शिवसागर जलाशयाची सफर म्हणजे अविस्मरणीय अनुभव. 

3/7

सह्याद्रीच्या कडेकपारीतलं महाबळेश्वर अनुभवताना हिरवळ पाहून डोळे सुखावतात.   

4/7

पाचगणीमधल्या सिडने पॉईंट, टेबल लॅन्ड आणि पारसी पॉईंटवर उभं राहिलं की निसर्गाच्या या जादुई कुंचल्याची किमया पाहाता येते.  

5/7

साताऱ्यातलं जिल्ह्यातलं महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, कोयना, बामणोली, ठोसेघर, ओझर्डे, भांबवलीचे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. 

6/7

 भन्नाट रानवारा, फेसाळलेले धबधबे, हिरवीगार सृष्टी हे सारं काही भन्नाट.... अलौकिक....  इथलं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते.   

7/7

महाबळेश्‍वर आणि कोयनानगर  म्हणजे निसर्गाला पडलेली दोन गोड स्वप्नं..