वर्ल्ड कपआधी ऋषभ पंत करणार टीम इंडियात कमबॅक; महत्त्वाची अपडेट समोर!

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. ऋषभ पंत गेल्या वर्षी कार अपघातात (rishabh pant Injury) गंभीर जखमी झाला होता. सध्या तो त्याच्या पुनर्वसनामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मध्ये आहे. त्यामुळे आता तो कधी कमबॅक करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Jul 09, 2023, 10:02 AM IST

Rishabh Pant, World Cup 2023: टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. ऋषभ पंत गेल्या वर्षी कार अपघातात (rishabh pant Injury) गंभीर जखमी झाला होता. सध्या तो त्याच्या पुनर्वसनामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी मध्ये आहे. त्यामुळे आता तो कधी कमबॅक करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

1/5

ऋषभ पंत टीम इंडियात कधी परतणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे संचालक श्याम शर्मा यांनी मोठी अपडेट दिली आहे.

2/5

बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये सुरू असलेल्या रिकव्हरीला ऋषभ पंत पुरेसा प्रतिसाद देत असल्याची माहिती त्यांनी दिली.

3/5

'ऋषभ चांगली प्रगती करतोय. एकदिवसीय विश्वचषकानंतर तो बरा होऊ शकतो आणि तो पूर्णपणे तंदुरुस्त घोषित झाल्यानंतरच बाहेर पडेल, असंही त्यांनी सांगितलं

4/5

पंतच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. मात्र, यानंतरही पंत फिट झाल्यानंतर विकेटकिपिंग करू शकणार का, हा प्रश्न कायम आहे.

5/5

ऋषभची फिटनेसची प्रगती उत्कृष्ट आहे. पण या टप्प्यावर, तो लगेच विकेटकीपिंग सुरू करेल की नाही हे सांगणे फार कठीण असल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं होतं.