World Cup 2023 मध्ये होणार Rishabh Pant चं पुनरागमन? महत्त्वाची माहिती समोर!

टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या फिटनेसवर सध्या सर्वांचं लक्ष लागलंय. 30 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे.  त्यामुळे आता टीम इंडियामध्ये (Team India) मोठी पोकळी निर्माण झालीये. अशातच ऋषभच्या फिटनेसवर महत्त्वाची माहिती समोर आलीये.

| May 16, 2023, 21:23 PM IST

Rishabh Pant Fitness: टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या फिटनेसवर सध्या सर्वांचं लक्ष लागलंय. 30 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे.  त्यामुळे आता टीम इंडियामध्ये (Team India) मोठी पोकळी निर्माण झालीये. अशातच ऋषभच्या फिटनेसवर महत्त्वाची माहिती समोर आलीये.

1/5

ऋषभ पंत आगामी वर्ल्ड कप (World Cup 2023) स्पर्धेत पुनरागमन करणार की नाही? असा सर्वात मोठा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात होता. त्यावर आता मोठी माहिती समोर आलीये.

2/5

ऋषभ पंतला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचं समजतंय. ऋषभ पंत वर्षअखेरीस देखील क्रिकेट खेळू शकणार नाही, अशी माहिती मिडिया रिपोट्सनुसार समोर आली आहे.

3/5

नुकतंच ऋषभ पंतने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन सुरू केलंय.  ऋषभ पंतने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एनसीएमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता त्याच्या फिटनेसवर सर्वांचं लक्ष आहे.

4/5

ऋषभ पंतच्या जागी आता आगामी वर्ल्ड कपमध्ये कोणत्या खेळाडूला संधी मिळणार याची सर्वजण वाट पाहत आहेत. ऋषभच्या जागी जितेश शर्मा या नवख्या खेळाडूला संधी दिली जाईल, अशी शक्यता आहे. 

5/5

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलंय. जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, के एल राहूल अशा बड्या खेळाडूंची नावं यामध्ये आहेत. त्यामुळे आता रोहित शर्माचं टेन्शन वाढलंय.