IPL 2023 : आयपीएलमधून भविष्यातील टीम इंडिया? अशी असेल प्लेईंग XI

Team India future playing XI: आयपीएलच्या सोळाव्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी छाप उमटवली आहे. त्यातही अनकॅप्ड खेळाडू चमकले आहेत. यातल्या काही खेळाडूंकडे भारतीय क्रिकेट संघाचं (Team India) भवितव्य म्हणून पाहिलं जातंय. या खेळाडूंनी दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे यातल्या प्रत्येक खेळाडूने आयपीएलमध्ये (IPL 2023) आपापल्या संघाला एकहाती सामना जिंकून दिला आहे. एक नजर टाकूय भविष्यातील टीम इंडियावर

May 16, 2023, 20:32 PM IST
1/8

भविष्यातील टीम इंडिया

आयपीएलचा सोळावा हंगाम आता निर्णयाक टप्प्याकडे वळतोय. यंदाच्या हंगामात काही युवा खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने आयपीएलवर छाप उमटवली आहे. भविष्यात या खेळाडूंना टीम इंडियात संधी मिळाल्यास प्रत्येक फॉर्मेटमध्ये ते चांगलंच प्रदर्शन करु शकतात. अशात आयपीएलमधून जर भविष्यातील टीम इंडियाची निवड करायची झाली तर या खेळाडूंना संधी मिळू शकते. 

2/8

यशस्वी - शुभमन गिल ओपनर्स

शुभमन गिलने गुजरात टायटन्सकडून खेळताना यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. गिलने आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यात तब्बल 576 धावा केल्या आहेत. तर राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या यशस्वी जयस्वलाने 13 सामन्यात 575 धावा केल्या आहेत. भविष्यातील टीम इंडिया डाव्या-उजव्या फलंदाजांचं जबरदस्त समीकरण पाहिला मिळेल. याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि प्रबासिमरन सिंह हे दोघंही पर्याय ठरु शकतील.

3/8

मिडल ऑर्डर - वेंकटेश अय्यर

डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज व्यंकटेश अय्यर KKR मध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळतोय. अशात भविष्यातील टीम इंडियातही तो याच क्रमांकावर खेळू शकतो. अय्यरने 13 सामन्यात 380 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याचा हायेस्ट स्कोर आहे 104 धावा.

4/8

रिंकू सिंह- तिलक वर्मा

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात केकेआरच्या रिंकू सिंहने संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाच सिक्स मारल्यानंतर चर्चेत आलेल्या रिंकूने 13 सामन्यात 407 धावा केल्या आहेत. तर मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्माने अशक्य विजय मिळवून दाखवलेत. तिलकने 274 धावा केल्या आहेत. मिडल ऑर्डरसाठी रिंकू-तिलक परफेक्ट खेळाडू ठरू शकतात.

5/8

नेहाल वढेरा- आयुष बदोनी

नेहाल वढेरा आणि आयुष बदोनी लोअर मिडिल ऑर्डरसाठी चांगले पर्याय ठरू शकतात. वढेराने 10 सामन्यात 198 धावा केल्या आहेत. तर आयुष बदोनीने 12 सामन्यात 212 धावा केल्या आहेत. 

6/8

विकेटकीपर - जितेश शर्मा/ अनुज रावत

भविष्यातील टीम इंडियात विकेटकिपर म्हणून जितेश शर्मा आणि अनुज रावत यांची वर्णी लागू शकते. पंजाबकडून खेळणाऱ्या जितेशने 12 सामन्यात 265 धावा केल्या आहेत. तर स्टम्पच्या मागे 5 विकेट घेतल्या आहेत. आरसीबीचा अनुज रावतने एका सामन्यात धोणी स्टाईलने विकेट घेतली होती. त्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला.

7/8

स्पिनर्ससाठी अनेक पर्याय

भविष्यातील टीम इंडियात स्पिनर्ससाठी चांगले पर्याय आहेत. यातही केकेआरचा सुयश शर्मा आणि वरुण चक्रवर्ती तर लखनऊचा रवी बिश्नोई आघाडीवर असतील. या तिघांनी आयपीएलमध्ये अनुक्रमे 10, 19 आणि 12  विकेट घेतल्या आहेत. 

8/8

वेगवाग गोलंदाजांची यादी

वेगवान गोलंदाजांच्या यादीत सीएसकेचा तुषार देशपांडे पहिल्या क्रमांकावर असेल. तुषारने 13 सामन्यात 19 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय हरप्रीत ब्रार, मुकेश कुमार आणि आकाश मधवाल यांचा समावेश होऊ शकतो.