Indian Railway: 'या' ट्रेनमध्ये इंजिनच नाही, वेग इतका की राजधानी-शताब्दीला टाकते मागे

विना इंजिन कोणती ट्रेन धावते का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण भारतातील एका रुळांवर अशी ट्रेन धावते ज्यात इंजिनच नाहीये. 

Mansi kshirsagar | Dec 23, 2024, 18:24 PM IST

Indian Railway: विना इंजिन कोणती ट्रेन धावते का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण भारतातील एका रुळांवर अशी ट्रेन धावते ज्यात इंजिनच नाहीये. 

1/7

Indian Railway: 'या' ट्रेनमध्ये इंजिनच नाही, वेग इतका की राजधानी-शताब्दीला टाकते मागे,

Indias First EngineLess Train That Sets New Speed Benchmark

इंजिन नसलेली ट्रेन अशी कोणतीये असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. मात्र भारतातील एका रेल्वे रुळांवर अशी एक ट्रेन धावते ज्यात इंजिन नाहीये. इंजिन नसतानाही ही ट्रेन सुपरफास्ट आहे. याच्या वेगापुढं राजधानी आणि शताब्दीदेखील फिक्या पडतील. 

2/7

 या ट्रेनच्या वेगाबरोबरच यात मिळणाऱ्या सुविधांदेखील खुप चांगल्या आहेत. ही देशाकील सर्वात पहिली इंजिनविहरीत ट्रेन आहे. त्यामुळं ट्रेन भारतात फारच लोकप्रिय आहे. 

3/7

इंजिन नसलेल्या या हायस्पीड ट्रेनचा वेग चाचणीदरम्यान 183 किमी प्रतितास इतका होता. मात्र रेल्वेरुळ अधिक सक्षम असल्याने ही ट्रेन 160 किमी प्रतितास वेगाने धावते. 

4/7

या ट्रेनचे नाव वंदे भारत एक्स्प्रेस आहे याला ट्रेन 18 असंदेखील म्हणतात. वंदे भारत एक्स्प्रेसने या ट्रेनला लोकप्रियता मिळाली आहे. रेल्वेची ही सेमी हाय स्पीड ट्रेन प्रवाशांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. 

5/7

वंदे भारत ट्रेनमध्ये इंजिन नाहीये हे ऐकुन तुम्हीदेखील थक्क व्हाल. ही ट्रेन पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीत तयार करण्यात आलेली ही पहिले इंजिनरहित ट्रेन आहे. ट्रेन 18 राजधानी आणि शताब्दी ट्रेन दोघांना मागे टाकते. 

6/7

तुम्ही कधी पाहिलं असेल की, भारतीय ट्रेनमध्ये एक वेगळं इंजिन कोच असतो जो बोगींना कनेक्ट असतो. मात्र या ट्रेन 18मध्ये मेट्रो ट्रेनप्रमाणेच एंटीग्रेटेड आहे. जे कोच आणि बोगींसोबतच कनेक्ट असते. 

7/7

इंजिन वेगळे नसल्याने याचा वेग अधिक असतो, इंजिनलेस इलेक्ट्रिक ट्रेन चालवण्यासाठी संपूर्ण सिस्टिम ट्रेनच्या बोगींमध्येच फिट करण्यात आलं आहे. तसंच, दोन लोकोमेटिव्ह पायलट ट्रेनमध्ये उपस्थित असतात.