पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्या

पावसाळा आता सुरूवात झाली आहे. पावसामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात.

Jul 03, 2019, 12:05 PM IST

मुंबई : पावसाळा आता सुरूवात झाली आहे. पावसामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. फक्त पावसाळ्यात मिळणाऱ्या या भाज्या तयार करण्यासाठी आणि खाण्यासाठी फार रूचकर असतात. नैसर्गिक पद्धतीने उगवल्यामुळे या भाज्या आरोग्यास लाभदायक असतात. फोडशी, शेवळं, करटूली, कुरडू,  रानातलं अळू, गावठी सुरण इत्यादी राजभाज्या फार रूचकर असतात.

1/5

कुलुची भाजी

कुलुची भाजी

पावसाळ्याच्या अगदी पहिल्या सरीनंतर कुलुची भाजी रानोमाळ दिसू लागते.  

2/5

कंटोळी

कंटोळी

कंटोळी एक फळभाजी असून ती पावसाळ्यात कमीतकमी १५ दिवसात पूर्ण उगवते. ही भाजी आरोग्यासाठी फार लाभदायक असते. कारल्याच्या भाजीसारखी ही भाजी बनवतात.  

3/5

कुरडू

कुरडू

या रानभाजीच्या कोवळ्या पानांपासून भाजी तयार केली जाते. पावसाच्या अगदी सुरूवातीला ही भाजी बाजारात उपलब्ध असते.   

4/5

टाकळ्याची भाजी

टाकळ्याची भाजी

ही भाजी दिसायला हुबेहूब मेथीच्या भाजी असते. मेथीच्या भाजीसारखी दिसणारी ही भाजी आरोग्यास लाभदायक असते.  

5/5

दिंडा

दिंडा

पावसाळ्याच्या पहिल्या सरींबरोबर या रानभाजीला कोंब फुटू लागतात. या भाजीची पूर्ण वाढ होण्याआधी तिचे कोंब खुडले जाते.