पृथ्वीक-प्राजक्ताच्या छोटेखानी लग्नामागं होतं 'आदर्श' कारण; अभिनेता म्हणतो...

अभिनेता पृथ्वीक प्रताप विवाहबंधनात अडकला आहे. पृथ्वीकने प्राजक्ता नावाच्या गोंडस मुलीशी लग्न केलं आहे. हा सोहळा इतका साधा होता की, त्याच्या साधेपणाची चर्चा तर होतच आहे पण त्याचा आदर्श लोकांनी घेतला आहे. पृथ्विक प्रताप 25-10-2024 रोजी विवाहबंधनात अडकला. 

अभिनेता पृथ्वीक प्रताप विवाहबंधनात अडकला आहे. पृथ्वीकने प्राजक्ता नावाच्या गोंडस मुलीशी लग्न केलं आहे. हा सोहळा इतका साधा होता की, त्याच्या साधेपणाची चर्चा तर होतच आहे पण त्याचा आदर्श लोकांनी घेतला आहे. पृथ्विक प्रताप 25-10-2024 रोजी विवाहबंधनात अडकला. 

1/8

अभिनेता पृथ्वीक प्रताप 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचला. पृथ्वीकने आपली मैत्रिण प्राजक्ताशी लग्न केलं आहे.

2/8

या दोघांनी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले. या फोटोंमध्ये पृथ्वीक प्राजक्ता आणि त्यांचा साधेपणा अधोरेखित होत आहे. मोती रंगाचे कपडे, गळ्यात मोगऱ्याच्या वरमाला आणि निसर्गाचा कॅनवास बस इतकंच या फोटोत आहे. 

3/8

पृथ्वीक प्रतापने अतिशय साधेपणाने लग्न केलं आहे. यामागचं कारण काय? तर अभिनेत्याने याबाबत खुलासा केला आहे. 

4/8

आधीपासूनच हा क्षण अगदी साधेपद्धतीने फक्त घरच्यांच्या सोबतीने साजरा करायचा होता. आम्ही दोघं आमच्या लग्नाचा खर्च एका सामाजिक कारणासाठी वापरणार आहोत. आम्ही दोघं मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेत आहोत. असं करुन कुणाचं तरी आयुष्य सुंदर बनवता येत असेल तर हेच आमच्या लग्नाचं बेस्ट गिफ्ट आहे, असं पृथ्वीक सांगतो. 

5/8

पृथ्वीकने आपल्या इंस्टाग्रावरुन हे फोटो पोस्ट केलेत. यावेळी एक नोट देखील लिहिली आहे. 'एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने!' अशी सुंदर नोट आहे. 

6/8

पृथ्वीकने आपली मैत्रिण प्राजक्ताशी लग्न केलं आहे. पण प्राजक्ताबद्दल फार माहिती कळलेली नाही. 

7/8

सोशल मीडिया अकाऊंटवरही प्राजक्ता कुठेच नाही. यामुळे पृथ्वीकच्या चाहत्यांना देखील प्राजक्ताबाबत अनेक प्रश्न पडत आहेत. 

8/8

पृथ्वीकने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेता प्रथमेश परबने देखील पृथ्वीक-प्राजक्तासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.