PHOTO : 17 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण, 3 अभिनेत्यांसोबत अफेअर, एकासोबत मोडला साखरपुडा...; पन्नाशीमध्ये 'ती' 20 कोटींची मालकीण

Entertainment : वयाच्या 17 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर 21 व्या वर्षी दोन मुलींची आई झाली. तर अभिनेत्रीची अक्षय कुमार, अजय देवगण आणि सनी देओलसोबतच अफेअर खूप चर्चा झाली होती. एका अभिनेत्यासोबत तिचा साखरपुडा मोडला होता. कोण आहे ही अभिनेत्री तुम्ही ओळखलं का?

| Oct 26, 2024, 10:47 AM IST
1/11

'चुरा के दिल मेरा गोरिया चली' पासून 'लेकर तू चीज बडी है मस्त-मस्त' पर्यंतची गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. ही गाणी गुणगुणत असताना एक सुंदर चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे रवीना टंडन. रवीना अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्याने 90 च्या दशकात आपल्या शैली आणि सौंदर्याने चाहत्यांनी घायाळ केलंय. 

2/11

ही अभिनेत्री तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. अभिनेत्रीचे नाव तिच्या काळातील अनेक दिग्गज कलाकारांशी जोडले गेले होतं. आज रवीनाचा वाढदिवस असून ती 50 वर्षांची झाली आहे.  त्यामुळे या खास प्रसंगी जाणून घेऊया तिच्याबद्दलचे काही ऐकलेले आणि न ऐकलेले किस्से.

3/11

रवीनाचा जन्म 26 ऑक्टोबर 1971 रोजी झाला. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती, म्हणून अभिनेत्री होण्यासाठी तिने शिक्षण अर्धवट सोडलं. मस्त-मस्त गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने 1992 मध्ये 'पत्थर के फूल' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला आणि तिने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीवर रातोरात अधिराज्य गाजवलं.

4/11

अभिनेत्रीचे पहिलं प्रेम होतं अक्षय कुमार. त्यांच्या डेटिंगच्या अफवा गॉसिप वर्तुळात पसरल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रवीना आणि अक्षयची गुपचूप एंगेजमेंटही झाली होती. पण अक्षयने शिल्पा शेट्टीसाठी रविनाला चीट केलं आणि त्याची भनक रविनाला पडली. त्यानंतर तिने साखरपुडा मोडला. 

5/11

यानंतर तिचं नाव अजय देवगणसोबत जोडले गेलं. हे नातंही फार काळ टिकलं नाही. पण यावेळी रविनाला नात तुटण्याचा जबरदस्त धक्का बसला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता. ती डिप्रेशनमध्ये गेली होती. 

6/11

अक्षय कुमारनंतर रवीनाने सनी देओलसोबत चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि यादरम्यान तिच्या तुटलेल्या हृदयाला सनीचा आधार मिळाला. मात्र, हे प्रकरण फार काळ टिकू नाही. याही नात्याला ब्रेक लागला. 

7/11

त्यानंतर रविना तिची बेस्ट फ्रेंड नताशा सिप्पीचा पती अनिल थडानीच्या प्रेमात पडली. नताशा आणि अनिल यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे बोललं जात आहे. यादरम्यान अनिल आणि रवीना यांच्यात जवळीक निर्माण झाली. अनिलचा घटस्फोट झाल्यावर रवीनाने त्याच्याशी लग्न केलं. 

8/11

फार कमी लोकांना माहितीय रवीना चार मुलांची आई आहे. अनिलशी लग्न केल्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. अनिलला पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे, ज्याचं नाव रणबीर वर्धन आहे. तर लग्नापूर्वी वयाच्या 21 व्या वर्षी तिने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. तर मोठी मुलगी छाया 11 वर्षांची असताना आणि पूजा 8 वर्षांची असताना तिला दत्तक घेतलं. छाया एअर होस्टेस आहे आणि पूजा इव्हेंट मॅनेजर आहे. खरंत या दोन्ही मुली रवीनाच्या निधन झालेल्या चुलत बहिणीच्या होत्या. रवीनाने आपला कायदेशीर पालक बनण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे संगोपन तिच्या आयुष्याचा एक भाग बनवले. आज मोठ्या मुलीच लग्न झालं असून रविना आजीही झाली आहे. 

9/11

आज आपल्या अभिनयाच्या जोरावर या अभिनेत्रीने करोडोंची संपत्ती जमा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री आता जवळपास 200 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे. एकेकाळी काही हजार रुपये कमावणारी रवीना टंडन आज महिन्याला दीड ते दोन कोटी रुपये कमावते. तिचं वार्षिक उत्पन्न सुमारे 20 कोटी रुपये आहे.

10/11

चित्रपटांव्यतिरिक्त, रवीना टंडन ब्रँड जाहिराती आणि सोशल मीडियावरून देखील भरपूर कमाई करते. यातून ती जवळपास 50 लाख रुपये फी घेते. रवीना टंडनच्या फीबद्दल बोलायचं झालं तर, आज अभिनेत्री एका भूमिकेसाठी सुमारे 2 ते 3 कोटी मानधन घेते. 

11/11

रवीना टंडन राजकारणात येण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण रवीनाने या अफवांना पूर्णविराम दिला. रवीनाने तिच्या मुलाखतीत सांगितलं होतं की, एकदा काँग्रेसची इच्छा होती की तिने गोविंदाच्या जागी निवडणूक लढवावी, मात्र तिने ऑफर स्वीकारली नाही.