श्रावणात मांसाहार का करु नये? जाणून घ्या यामागचं शास्त्रीय कारण

आयुर्वेदात श्रावणात काय खावं आणि काय खाऊ नये हे सांगितलं आहे. 

Aug 05, 2024, 13:04 PM IST

आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. हा सणांचा महिना म्हणूनही ओळखला जातो. असं म्हणतात की, भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे. 

1/7

हिरवागार निसर्ग आणि आजूबाजूला असलेलं धार्मिक वातावरण या सगळ्याने श्रावण अनेकांना आवडतो. 

2/7

ऊन पावसाचा खेळ सतत सुरु असल्याने हवामान बदलाचा त्रास होतो म्हणूनच आयुर्वेदात श्रावणात काय खावं आणि काय खाऊ नये हे सांगितलं आहे. 

3/7

हवामानानुसार आहार घेतला कि प्रत्येक ऋतूत शरीर तंदुरुस्त राहतं. म्हणूनच आयुर्वेदात कोणत्या महिन्यात काय आहार असावा हे सांगितलं आहे. 

4/7

जीवजंतूंच संक्रमण जास्त असतं त्यामुळे श्रावणात मांसाहार खाऊ नये हे शास्त्रीय कारण आहे. 

5/7

या दिवसात मासेमारी सहसा केली जात नाही त्यामुळे साठवणीतले मासे बर्फात ठेवले जातात. यामुळे आरोग्य बिघडू शकते म्हणून मासे खाऊ नयेत.

6/7

म्हणूनच शरीराला पोषक घटक मिळावेत यासाठी रानभाज्या खायलाच पाहिजेत असं तज्ज्ञ सांगतात. 

7/7

टाकळा,कुरडू, भारंगी,एक पानी ,  कोवळ्या बांबूची भाजी,  कुडाच्या शेंगा या रानभाज्यांचा आहारात समावेश केल्याने हिमोग्लोबीन वाढणं, पोट साफ होणं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.