दुपारच्या जेवणानंतर का येतो थकवा? जाणून घ्या कारण आणि उपाय
जेऊन झाल्यावर दुपारच्या वेळेत झोप येणे ही सर्वसामान्य बाब आहे. पण ही झोप टाळण्यासाठी तुम्ही कॉफी, सिगारेटच्या आहारी जात असाल तर ते चुकीचे आहे.
Pravin Dabholkar
| Apr 22, 2024, 15:06 PM IST
Feel Tired after Lunch: जेऊन झाल्यावर दुपारच्या वेळेत झोप येणे ही सर्वसामान्य बाब आहे. पण ही झोप टाळण्यासाठी तुम्ही कॉफी, सिगारेटच्या आहारी जात असाल तर ते चुकीचे आहे.
1/6
दुपारच्या जेवणानंतर का येतो थकवा? जाणून घ्या कारण आणि उपाय
Feel Tired after Lunch:ऑफिसमध्ये असताना दुपारच्या वेळेत आळस येतो का?, हलकी झोप येते?, थकल्यासारखे वाटते? असं तुमच्यासोबत नेहमी होतं? मग तुमच्यासाठी ही अपडेट महत्वाची आहे. कामाला जाणाऱ्या बहुतांश जणांना स्वत:मध्ये ही लक्षणे आढळतात. दुपारची डुलकी येऊ लागली की आपण कॉफी प्यायला जातो. यामुळे शरीरातील कॅफेन अधिक वाढते. कॉफीचे जास्त सेवन केलात तर रात्रीची झोपदेखील येणार नाही. कॅलिफॉर्नियाच्या डेविस येथील न्यूट्रिशियनिस्ट डॉ. क्रिस्टोफर रोड्स यांनी याची कारणे आणि उपाय सांगितला आहे.
2/6
दुपारच्या वेळेत झोप येणे ही सर्वसामान्य बाब
3/6
पोटभर खाऊ नका
काहीजण जेव्हा संधी मिळेल तेव्हा काहीना काही खात असतात. यामुळे झोप येऊ शकते आणि रक्तातील साखर अनावश्यकरित्या वाढते. छोट्या स्नॅक्समुळे आपली भूक मिटत नाही. म्हणजेच तुम्ही जे खाताय ते जीभेसाठी चांगले वाटेल पण पोटातील भूक मिटणार नाही. या खाण्यात असे काही पदार्थ टाकलेले असतात, ज्यामुळे ते अधिक खावेसे वाटतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे.
4/6
जास्त साखर असलेले पदार्थ टाळा
पूर्ण दिवस तुम्हाला ग्लुकोज कसे नियंत्रणात राहीलं, याची काळजी घ्ययला हवी. ग्लुकोज हे साखरेचे रुप आहे. तुम्ही जे गोड पदार्थ खाता, ते शरीरात ग्लुकोजच्या रुपात साठवले जातात आणि नंतर एनर्जी देतात. पण ग्लुकोजची पातळी जास्त असेल तर कमजोरी, थकवा जाणवू शकतो. त्यामुळे जास्त गोड पदार्थ खाणे टाळा, असा सल्ला एक्सपर्ट देतात.
5/6
कॉफी पिणं टाळा
झोप आल्यावर लोकं वारंवार कॉफी पितात. हे आधी बंद करा. कॉफीत साखर टाकून प्यायल्यास ग्लुकोज वाढते. साखरेप्रमाणे कॅफेनदेखील तात्काळ एनर्जी देते पण काही तासात सुस्ती येण्याच कारण बनते. त्यामुळे कॉफीपेक्षा ग्रीन टी प्या. यामध्ये कॅफेन असते. पण अॅंटी ऑक्सीडेंट आणि एल-थेनाइनसारखे कंपाऊंडदेखील असतात. एल थेनाइन एक अमिनो एसिड आहे, जे स्ट्रेस, इम्सोम्निया आणि नैराश्य कमी करण्यास मदत करते.
6/6