ठाणे, विरारमध्ये विस्तारलेली DMart स्टोअर्स मुंबईत का नाहीत?

मुंबईबाहेर म्हणजेच ठाणे, कल्याण, वसई, विरार येथे लोक महिन्याचं राशन भरण्यासाठी डी-मार्टला पसंती देतात. एकाच छताखाली सर्व सामान आणि तेदेखील बाजारमूल्यापेक्षा कमी किंमतीत मिळत असल्याने सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.  

Aug 26, 2024, 18:28 PM IST

मुंबईबाहेर म्हणजेच ठाणे, कल्याण, वसई, विरार येथे लोक महिन्याचं राशन भरण्यासाठी डी-मार्टला पसंती देतात. एकाच छताखाली सर्व सामान आणि तेदेखील बाजारमूल्यापेक्षा कमी किंमतीत मिळत असल्याने सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात खरेदी करतात.

1/8

2/8

पण ही डी-मार्ट स्टोअर्स मुंबईत दिसत नाहीत. मुंबईत फक्त डी-मार्टचे पिकअप पॉईंट्स आहेत. नेमकं यामागील कारणं काय आहेत हे जाणून घेऊयात.  

3/8

भूसंपादन

भूसंपादन

मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये डीमार्ट स्टोअर्ससाठी योग्य जमीन शोधणे कठीण आणि महाग पडू शकतं. DMart स्टोअर्स सामान्यत: मोठी असतात आणि त्यांना खूप जागा लागते. तसंच ही स्टोअर्स जास्त लोकसंख्या असलेल्या भागात असणं जास्त आवश्यक असतं.   

4/8

तसंच माहितीनुसार, डी-मार्टच्या यशातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ते जमीन भाडेतत्वावर घेण्याऐवजी विकत घेतात.   

5/8

जागेची मर्यादा

जागेची मर्यादा

डीमार्ट स्टोअर्स सामान्यत: मोठी असतात आणि त्यांना चांगल्या लोकेशनची आवश्यकता असते. मुंबई आणि चेन्नईसारख्या प्रमुख शहरांमध्ये, रिअल इस्टेटच्या किमती खूप जास्त आहेत, ज्यामुळे नवीन स्टोअर्साठी योग्य जागा शोधणे कठीण होतं.  

6/8

स्पर्धा

स्पर्धा

मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये आधीपासूनच अनेक रिटेल चेन्स आहेत ज्यांनी मार्केट काबीज केलं आहे. अशा स्थितीत डी-मार्टला ग्राहक खेचण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागेल.   

7/8

पुरवठा साखळी

पुरवठा साखळी

DMart चं व्यवसाय मॉडेल मजबूत आणि कार्यक्षम पुरवठा साखळीवर अवलंबून आहे. नवीन शहरांमध्ये विस्तार करण्यासाठी डी-मार्टला नवीन वितरण केंद्रं आणि लॉजिस्टिक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करावी लागेल.  

8/8

नफ्यावर लक्ष

नफ्यावर लक्ष

DMart कमी किमती आणि जास्त नफा यासाठी ओळखले जाते. खर्च कमी ठेवणे आणि जास्त मार्जिन उत्पादनांची मर्यादित निवड ऑफर करणे यासारख्या काही प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून ते हे साध्य करतात. नवीन शहरांमध्ये विस्तार करण्यासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक आहे. डीमार्टला विस्तार करतानाही नफा टिकवून ठेवता येईल याची खात्री करायची आहे.