छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप विचार करुन बांधला होता राजकोट किल्ला; तीन बाजूंनी समुद्र आणि एका बाजूला जमिन

राजकोट किल्ला कधी बांधला? या किल्ल्याचे महत्व काय जाणून घेऊया.

| Aug 26, 2024, 18:21 PM IST

Sindhudurg Rajkot Fort Shivaji Maharaj Statue :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. कारण, या राजकोट किल्ल्यावर (Rajkot Fort) नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. या घटेनबाबत शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जाणून घेऊया राजकोट किल्ल्याचा इतिहास. 

1/7

राजकोट किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातील अत्यंत महत्वाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप विचार करुन राजकोट किल्ला बांधला. 

2/7

या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023ला मालवणमध्ये येऊन या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं. हा पुतळा आता कोसळला आहे. 

3/7

सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाणार्‍या बोटी मालवण जेट्टीवरुन सुटतात. या जेट्टीवरुन उत्तरेकडे किनार्‍याने चालत गेल्यास 15 मिनिटात राजकोट किल्ल्यावर जाता येते.

4/7

 राजकोट किल्ल्यावरुन सिंधुदूर्ग किल्ला व आजुबाजुचा परिसर दिसतो. तीन बाजूंनी पाणी (समुद्र) व एका बाजूला जमिन असा हा किल्ला आहे. 

5/7

मालवणच्या किनार्‍यावर उत्तरेकडे खडकाळ व काहीसा उंच भाग आहे. येथीलच एका खडकावर राजकोट किल्ला बांधला.

6/7

इ.स 1664 ते 1667 च्या दरम्यान शिवाजी महाराजांनी राजकोट किल्ल्याची उभारणी केली. किल्ल्यावर एक बुरुज व तटबंदीचे अवशेष सोडल्यास मुळ किल्ल्याचे कोणतेही अवशेष नाहीत.

7/7

 छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ला बांधल्यावर त्याचे रक्षण करण्यासाठी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट हे किल्ले बांधले.