'दिल से' नंतर शाहरुख खानसोबत सिनेमा का केला नाही? मनीषा कोईरालाचा धक्कादायक खुलासा

Manisha Koirala On Shah rukh khan : शाहरुख खान आणि मनिषा कोईराला यांचा ‘दिल से’ हा चित्रपट मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमाला आज 26 वर्ष पूर्ण झाली आहेत. शाहरुख आणि मनिषा यांची जोडी चांगलीच चर्चेत आली होती.

Saurabh Talekar | Aug 21, 2024, 20:11 PM IST
1/5

दिल से

शाहरुख खान आणि मनिषा कोईराला यांच्या दिल से सिनेमाला 28.40 कोटींचा व्यवसाय केला होता. या सिनेमामध्ये प्रीती झिंटा देखील होती. मात्र, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही.

2/5

शाहरुख आणि मनिषा

‘दिल से’ या चित्रपटानंतर शाहरुख आणि मनिषा यांची जोडी पुन्हा कधीही एकत्र दिसली नाही. जेव्हा मनिषाला यावर प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने धक्कादायक उत्तर दिलं.

3/5

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत नायक ठरवतो की त्याला कोणासोबत काम करायचे आहे, नायिका नाही, असं मनिषा कोईरालाने म्हटलं आहे. मनिषाने असं वक्तव्य करून शाहरुख खानवर निशाणा साधला आहे.

4/5

हिरामंडी

अभिनेत्री मनिषा कोईराला खूप दिवसानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आली. हिरामंडी या वेब सीरिजमधून मनिषाने कमबॅक केलं अन् चाहत्यांनी देखील तिला डोक्यावर उचलून घेतलं होतं.

5/5

नाना पाटेकर

दरम्यान, 90 च्या दशकात जेव्हा मनिषाचे करिअर शिखरावर होतं तेव्हा तिचं नाव जवळपास 12 लोकांशी जोडले गेलं होतं. ती चित्रपटसृष्टीव्यतिरिक्त इतर क्षेत्रांशी संबंधित होती. यामध्ये नाना पाटेकर यांच्या नावाची देखील चर्चा होती.