8 कारणे वाचून म्हणाल, आजकालचे पालक जुन्यांपेक्षा चांगलेच!

पालकत्व हे पिढ्यानपिढ्या आणि माणसागणिक बदलत जातं. आमच्या काळात असं नव्हतं, असं म्हणत प्रत्येक पालक आपल्या पालकत्वाची गोष्टी निराळी असल्याचं मांडतं. पण एका रिपोर्टनुसार आजचे पालक हे जुन्या पालकांपेक्षा चांगल पालकत्व निभावत असल्याचं अधोरेखित झालं आहे. 

| Aug 21, 2024, 19:22 PM IST

पालकत्व हे काळानुरुप बदलत गेलं आहे. मुलांचं संगोपन करण्याची पद्धत पिढ्यानपिढ्या बदलत गेली आहे. आजच्या तरुण पालकांनी पालकत्वाचा खूप सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारला आहे. त्याचसोबत आताचे पालक सामाजिक नवनवीन शैलीचा, तंत्रज्ञानाचा आणि मुलांच्या मानसिकतेचा विचार करतात. आताच्या पालकांमधील 8 महत्त्वाचे गुण ज्यामुळे त्यांची पालकत्त्वाची पद्धत ही जुन्या पालकांच्या पद्धतीपेक्षा नक्कीच उजवी ठरते. 

1/6

सर्वांगिण विकास

आताचे पालक हे मुलांच्या सर्वांगिण विकासाचा विचार करतात. यामध्ये मुलांचा शैक्षणिक, क्रिडा आणि अभ्यासेत्तर इतर गोष्टींचापण विचार करतात. आताचे पालक मुलांना अभ्यासासोबतच त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर भर देतात. मुलाचा विकास हे एक टीम वर्क असल्याचं ते समजतात. 

2/6

मोकळी चर्चा

आताचे पालक हे मुलांशी खूप मोकळेपणाने चर्चा करण्याला भर देतात. मुलांच्या भाव-भावना, त्यांचे आताचे विचार आणि मुलांच्या इच्छा-आकांक्षांना जास्त भर देतात. यामुळे मुलं पालकांशी अतिशय मोकळेपणाने चर्चा करतात. यामुळे मुलांच्या मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पालकांना अंदाज असतो. 

3/6

सक्तीचे नियम

पालकांनी मुलांशी सक्तीने वागणे हा काळ आता मागे पडत चालला आहे. मॉडर्न किंवा आताचे पालक हे मुलांना वेगवेगळ्या स्तरावर आपली आवड जोपासण्याची संधी देतात. मुलगा-मुलगी असे नियम आताच्या पालकांच्या पालकत्वामध्ये नसतात. तसेच त्यांचे संगोपन करत असताना आई-वडिल यांचे वेगवेगळे नियम नसतात. पालक आणि मुलं असा निर्णय घेतला जातो. 

4/6

तंत्रज्ञानाचा वापर

नवीन पालक मुलांसाठी नव नव्या तंत्रज्ञानाचा वापर करतात. मुलांच्या अभ्यासासाठी सतर्क असतात. तसेच मुलांना काही विशिष्ट मर्यादा देखील पालक घालून देतात. पालक मुलांसाठी नव नव्या गोष्टी शिकून घेतात आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल करतात. 

5/6

भावनिकदृष्ट्या सक्षम करतात

नवे पालक मुलांना भावनिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदतात. मुलांना आपल्या भावना कशा मांडायच्या याचे मार्गदर्शन पालक करत असतात. वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून पालक मुलांशी कनेक्ट होतात. एखादी परिस्थिती किंवा घटना कशा प्रकारे हाताळायची याचं मार्गदर्शनही पालक करताना दिसतात. 

6/6

शरीराबद्दल करतात सतर्क

आताचे पालक मुलांना लहानपणापासून आपल्या शरीराबद्दल सतर्क करतात. आताचे पालक मुलांना त्यांच्या शरीराची ओळख अगदी लहानपणापासूनच करुन देतात. शरीरात वयानुसार होणारे बदल मुलांनी कसे स्वीकारावेत याबाबत सतर्क करतात.