Hardik Pandya: CSK विरूद्धच्या सामन्यात हार्दिकने का टाकली शेवटची ओव्हर? अखेर खरं कारण आलं समोर

Hardik Pandya : गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पंड्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येतंय. दरम्यान अशातच हार्दिकने चेन्नईविरूद्ध झालेल्या सामन्यात शेवटची ओव्हर टाकल्याने तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. 

Surabhi Jagdish | Apr 17, 2024, 12:02 PM IST
1/7

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने शेवटची ओव्हर फेकली. यामुळे त्याला ट्रोल करण्यात आलं. याचं कारण म्हणजे कारण धोनीने या ओव्हरमध्ये तीन सिक्स लगावले. 

2/7

तीन गोलंदाजांची ओव्हर शिल्लक असताना हार्दिक पंड्याने का अखेरची ओव्हर टाकली, याचे कारण आता समोर आलं आहे.

3/7

19 वी ओव्हर बुमराहने टाकल्यानंतर 20 वी ओव्हर कोण टाकणार हा प्रश्न होता. 

4/7

दुसरीकडे  मोहम्मद नबी आणि आकाश मढवाल यांचे प्रत्येकी एक ओव्हर बाकी होते. श्रेयस गोपालने एक विकेट घेऊनही त्याला नंतर गोलंदाजी दिली नव्हती, त्यामुळे त्याच्या 3 ओव्हर्स बाकी होत्या.

5/7

आयपीएलनंतर टी-20 वर्ल्डकप खेळवला जाणार असून हार्दिक फॉर्मात नसल्यामुळे त्याचा पत्ता कट होऊ शकतो, अशी शक्यता आहे. 

6/7

पण हार्दिकने एक गोलंदाज म्हणून जर 3-4 ओव्हर गोलंदाजी केली तर त्याचा विचार टी-20 वर्ल्ड कपसाठी केला जाऊ शकतो.

7/7

याच कारणामुळे हार्दिकने शेवटची ओव्हर स्वतः टाकली असल्याचं समोर येतंय.