रेल्वे स्थानकांवरील फलक फक्त पिवळ्याच रंगात का असतात? हे आहे कारण

तुम्ही सतत रेल्वेने प्रवास करत असाल तर रेल्वे स्टेशनवर पिवळ्या रंगाचे फलक पाहिले असतील. मात्र, हे फलक पिवळ्या रंगाचे का असतात? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

| Sep 05, 2024, 17:49 PM IST
1/6

रेल्वे स्टेशनवरील फलक

तुम्ही कधी विचार केला आहे का की रेल्वे स्टेशनवरील नावाचे फलक हे पिवळ्या रंगात का असतात. हे फलक इतर रंगात का रंगवले जात नाहीत. 

2/6

आकर्षक रंग

आम्ही तुम्हाला सांगतो की, पिवळा रंग हा अतिशय तेजस्वी असण्यासोबतच अतिशय आकर्षक आहे. हा रंग रेल्वे चालकाला खूप दुरुनच दिसतो. 

3/6

सतर्क

रेल्वे स्टेशनवरील पिवळ्या रंगाचे फलक ट्रेनच्या लोको पायलटला गाडीचा वेग कमी करण्यासाठी किंवा सतर्क राहण्याचे संकेत देतात. 

4/6

इतर रंगापेक्षा वेगळा

रेल्वे स्टेशनवरील असणाऱ्या गर्दीमध्ये देखील पिवळा रंग हा इतर रंगापेक्षा खूप चांगला दिसतो. 

5/6

काळ्या रंगाचे लेखन

त्याचबरोबर पिवळ्या फलकावर काळ्या रंगाचे लेखन खूप प्रभावी दिसते. ते खूप लांबून देखील स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. 

6/6

पाऊस, धुके

पाऊस, धुके किंवा सूर्यप्रकाशात देखील पिवळ्या फलकावर मोठी काळी अक्षरे सहज दिसतात.