ऐश्वर्या राय रेखा यांना आई म्हणून हाक का मारते? खरं कारण ऐकून वाटेल आश्चर्य

Aishwarya Rai And Rekha Relationship: बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय आणि रेखा यांच्यात खास नातं आहे. ऐश्वर्या राय रेखा यांना आई म्हणून हाक मारते. पण यामागे नेमकं कारण काय?   

| Dec 02, 2024, 17:51 PM IST

Aishwarya Rai And Rekha Relationship: बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय आणि रेखा यांच्यात खास नातं आहे. ऐश्वर्या राय रेखा यांना आई म्हणून हाक मारते. पण यामागे नेमकं कारण काय? 

 

1/8

Aishwarya Rai And Rekha Relationship: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबाची सून आहे. सध्या ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबामधील नात्यात दुरावा आल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच ऐश्वर्या आणि अभिषेक वेगळे होत असल्याचेही दावे होत आहेत. ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यात अजिबात पटत नसल्याचं सांगितलं जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ऐश्वर्या रायचे जया बच्चन यांच्यापेक्षा रेखा यांच्याशी जास्त चांगले संबंध आहेत.   

2/8

ऐश्वर्या राय आणि रेखा यांच्या चाहत्यांनी कल्पना आहे की, दोघी फार निकटवर्तीय आहेत. ऐश्वर्या राय रेखा यांना आपली आई मानते आणि त्यामुळे ती त्यांना 'आई' अशी हाक मारते. पण यामागे नेमकं कारण का? जाणून घ्या  

3/8

रेखा देखील ऐश्वर्या रायला आपल्या मुलीपेक्षा कमी मानत नाहीत. रेखा ऐश्वर्याला भेटल्यानंतर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतात. अलीकडेच दोघी अनंत अंबानीच्या लग्नात दिसल्या होत्या, जिथे रेखा यांनी आराध्या आणि ऐश्वर्या या दोघींवर प्रेमाचा वर्षाव केला होता.  

4/8

अनंत अंबानींच्या लग्नातील ऐश्वर्या राय आणि रेखा यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. फोटोत ऐश्वर्या राय रेखा यांच्या पाया पडताना दिसली होती. हे फोटो पाहून काहीजण खूश तर काहीजण आश्चर्यचकित झाले होते.   

5/8

पण तुम्हाला माहिती आहे का, ऐश्वर्याने आपल्या सर्वात पहिल्या अवॉर्ड शोमध्ये संपूर्ण जगासमोर रेखा यांना आई म्हणून हाक मारली होती. त्यावेळी ऐश्वर्याने रेखा यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला होता. आईच्या हस्ते पुरस्कार स्विकारणं सन्मान असल्याचं ती म्हणाली होती. तेव्हा संपूर्ण फिल्म इंडस्ट्री आश्चर्यचकित झाली होती.   

6/8

ऐश्वर्या आणि रेखा यांच्यातील नात्यासाठी एकच संस्कृतीही कारणीभूत आहे. ऐश्वर्या आणि रेखा दोघीही दक्षिण भारतातील आहेत. तिथे महिलांना आई हाक मारत, आईसारखाच सन्मान दिला जातो.   

7/8

ऐश्वर्या राय दाक्षिणात्य संस्कृती डोळ्यासमोर ठेऊन न डगमगता रेखा यांना 'आई' म्हणते आणि रेखाही तिच्यावर आईसारखं प्रेम असल्याचा दावा करतात.  

8/8

ऐश्वर्या राय वगळता बच्चन कुटुंबातील कोणीही रेखा यांच्याशी बोलत नाही. रेखा आणि अमिताभ यांचा एक इतिहास आहे आणि त्यामुळेच संपूर्ण बच्चन कुटुंब रेखापासून दूर राहते.