कोल्हापूरच्या गादीचा खरा वारसदार कोण? लोकसभा निवडणुकीत वेगळाच वाद

lok sabha election 2024 : कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र आपणच राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार आहोत, असा दावा राजवर्धनसिंह कदमबांडे यांनी केलाय. नेमका काय आहे हा गादीचा वाद?

वनिता कांबळे | Apr 28, 2024, 19:33 PM IST

Kolhapur Chhatrapati Shahu Maharaj :  कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत वेगळाच वाद उफाळून आलाय.. हा वाद आहे गादीच्या ख-या वारसदाराचा...कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज, तर महायुतीकडून संजय मंडलिक अशी लढत रंगलीय. मंडलिकांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापुरात सभा घेतली. तेव्हा मविआनं त्याला गादी विरुदध मोदी असा रंग दिला... त्याला प्रत्युत्तर म्हणून महायुतीनं मोठी राजकीय खेळी खेळलीय.. राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धनसिंह कदमबांडे यांना मंडलिकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरवलंय.. कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार आपणच आहोत, असा दावा कदमबांडेंनी केला आहे. 

1/10

1984 - इचलकरंजीमधून लोकसभा निवडणूकही लढवली

2/10

कदमबांडे धुळ्याचे माजी आमदार

3/10

ते चिरंजीव म्हणजे धुळ्याचे राजवर्धनसिंह कदमबांडे

4/10

प्रिन्सेस पद्माराजेंच्या चिरंजीवांना दत्तक घ्यावं, अशी जनभावना

5/10

छत्रपती राजाराम महाराजांची कन्या प्रिन्सेस पद्माराजे

6/10

दत्तकविधानाला कोल्हापूरकर जनतेचा विरोध

7/10

दत्तक विधानानंतर 'छत्रपती शाहू महाराज' नामकरण

8/10

दिलीपसिंह असं त्यांच्या चिरंजीवांचं मूळ नाव

9/10

कन्या शालिनीराजेंचा नागपूरच्या राजारामसिंह यांच्याशी विवाह

10/10

1962 - छत्रपती शहाजी महाराजांकडून कन्येचे चिरंजीव दत्तक.