जान्हवीच्या बॉयफ्रेंडला साधा समजू नका; आजोबा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, पंजाबचे राज्यपाल...

Who is Shikhar Pahariya:  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा प्रियकर शिखर पहारिया लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. शिखर पहारिया सोलापूरमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.   

| Sep 19, 2024, 20:56 PM IST

Who is Shikhar Pahariya:  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा प्रियकर शिखर पहारिया लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. शिखर पहारिया सोलापूरमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 

 

1/11

Who is Shikhar Pahariya:  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा प्रियकर शिखर पहारिया लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्याची शक्यता आहे. शिखर पहारिया सोलापूरमधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. शिखर पहारियाच्या कुटुंबाची राजकारणाची पार्श्वभूमी आहे. हा शिखर पहारिया नेमका कोण आहे जाणून घेऊयात.   

2/11

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर ही शिखर पहारियासह नात्यात आहे हे आता जगजाहीर आहे. जान्हवी कपूरने 'कॉफी विथ करण 8' मध्ये चुकून शिखरचं नाव घेत कबुली दिली होती. यानंतर अनेकांना त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती.   

3/11

शिखर पहारिया राजकीय कुटुंबातील आहे. शिखर पहारिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.   

4/11

सुशीलकुमार शिंदे यांना तीन मुली असून शिखर हा स्मृती शिंदे आणि व्यावसायिक संजय पहारिया यांचा मुलगा आहे.  

5/11

शिखर पहारिया आता महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे. कोणत्याही परिस्थितीत खासदार प्रणिती शिंदे यांना आपला सोलापूर शहर मध्य विधानसभेचा काँग्रेसचा बालेकिल्ला आबाधित ठेवायचा आहे. यासाठी शिंदे परिवारातीलच सदस्य हवा अशी मागणी जोर धरत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शिखरच्या माध्यमातून आपला हुकमी एक्का बाहेर काढल्याची चर्चा आहे.  

6/11

शिखर आणि जान्हवी दोघेही एकाच शाळेत शिकले. तेव्हापासून दोघांमध्ये चांगली मैत्री होती. दोघांनी हायस्कूलपर्यंत एकत्र शिक्षण घेतलं आहे.   

7/11

26 वर्षीय शिखर पहारिया तरुण व्यावसायिक आहे. याशिवाय तो एक व्यावसायिक पोलो खेळाडूदेखील आहे.   

8/11

शिखर पहारियाने 2018 मध्ये मनोरंजन आणि गेमिंगचा व्यवसाय सुरू केला आणि त्याआधी तो लंडनस्थित एका फर्ममध्ये गुंतवणूक विश्लेषक म्हणून काम करत होता.   

9/11

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिखर पहाडिया सुमारे 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 84 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे.   

10/11

वीर पहारिया हा शिखर पहारियाचा धाकटा भाऊ आहे. सारा अली खानसह नात्यात असल्याने तो चर्चेत होता.   

11/11

वीर पहारिया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो 'स्काय फोर्स' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात वीर पहारियासोबत अक्षय कुमारही दिसणार आहे.