आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकत्र या.... पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ख्रिसमसच्या निमित्ताने देशवासियांना संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी ख्रिसमस दिनानिमित्त दिल्लीत कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मोदींनी देशवासियांना आवाहन केलं आहे. 

| Dec 24, 2024, 10:38 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येशू ख्रिस्ताच्या शिकवणीचं यावेळी स्मरण केलं. तसेच ख्रिसमसच्या सणाच्या आधी देशवासियांना बंधुभावाची भावना मजबूत करण्याचे आवाहन केले. 

1/9

सगळीकडे ख्रिसमस म्हणजे नाताळ सणाचा उत्साह आहे. येशू ख्रिस्तचा जन्माचा हा सोहळा जगभरात अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.   

2/9

जेव्हा हिंसाचार पसरवण्याचा आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याचे मन दुखावते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

3/9

 राजधानी दिल्लीतील CBCI केंद्र परिसरात कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया (CBCI) द्वारे आयोजित ख्रिसमस उत्सवात भाग घेतल्यानंतर आपल्या भाषणात पंतप्रधानांनी अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याबद्दलही बोलले.

4/9

जर्मनीच्या ख्रिसमसचा केला उल्लेख

देशाच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले. 

5/9

पंतप्रधान म्हणाले, 'प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणी प्रेम, सद्भाव आणि बंधुता साजरी करतात. ही भावना बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी काम करणे महत्त्वाचे आहे,' असे सांगून मोदी म्हणाले की, अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण एकत्र येणे महत्त्वाचे आहे. 

6/9

काही दिवसांपूर्वीच जर्मनीत मॅग्डेबर्गमधील ख्रिसमस मार्केटमध्ये एका कारने घुसून लोकांना चिरडल्याची मोठी घटना घडली होती. या अपघातात लहान मुलांसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 

7/9

सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांनी आपण आपला देश पुढे नेऊ, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. ते म्हणाले की, विकसित भारत हे सर्वांचे ध्येय आहे आणि ते आपल्याला मिळून साध्य करायचे आहे.

8/9

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'येत्या पिढ्यांना उज्ज्वल भारत देणे ही आपली जबाबदारी आहे.' 

9/9

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पोप फ्रान्सिस यांच्या हस्ते कार्डिनल ही पदवी प्रदान केल्याचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की, भारताचा मुलगा जेव्हा या उंचीवर पोहोचेल. यशाचा संपूर्ण देशाला अभिमान वाटणे स्वाभाविक आहे.